Parineeti-Raghav marriage : परिणीती-राघवने बांधली लग्नगाठ; शाही विवाह उदयपूरमध्ये संपन्न

पुढारी ऑनलाईन डेस्क : राघव चढ्ढा आणि परिणीती चोप्रा यांनी आज उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये लग्नगाठ बांधली. ( Parineeti- Raghav marriage ) त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला एंगेजमेंट केली होती. त्यांचा लग्न सोहळा प्रसिद्ध वेडिंग डेस्टिनेशनवर पार पडला. या समारंभात सेहराबंदी आणि जयमाला यांसारख्या पारंपारिक विधींचा समावेश होता. या लग्नाला सानिया मिर्झा आणि हरभजन सिंगसह अनेक सेलिब्रिटी पाहुणे उपस्थित होते. या जोडप्याच्या लग्नाआधीचे उत्सव 90 च्या दशकाच्या थीमवर आधारित संगीत रात्रीने चिन्हांकित केले होते.
संबधित बातम्या
- Parineeti-Raghav wedding : राघव-परिणीतीच्या लग्नात पंचपकवान्नांचा बेत; काय आहे खास नियोजन?
- Priyanka Chopra : निक जोनससोबत देसी गर्लचे मुंबईत आगमन, क्यूट मालतीही दिसली
- Parineeti-Raghav wedding: आली लग्न घडी समीप;परिणीती-राघव घेणार सात फेरे
या लग्नाला कलाकांरासोबत टेनिसपटू सानिया मिर्झा, डिझायनर मनिष मल्होत्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उपस्थित होते. राघवने बोटीतून शाही विवाहाला पोहोचला आहे. यावेळी राघवने व्हाईट रंगाच्या शेरवानीत एकदम हॅडसम दिसला. मात्र, लग्नाचे फोटो काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
परिणीती आणि राघव रविवारी (दि. २४ संप्टेबर) रोजी पंजाबी पद्धतीने विवाह बंधनात ( Parineeti- Raghav marriage ) अडकले. लग्नाचे विधी दुपारी २. ३० वाजल्यानंतर सूरु झाले. विवाहाला बॉलिवूडमधील अनेक स्टार्ससोबत राजकिय नेत्यांनी हजेरी लावली आहे. परंतु, परिणीतीची बहिण आणि बॉलिवूड- हॉलिवूड स्टार्स प्रियांना चोप्रा बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहते की नाही? याबद्दल संभ्रम आहे. तर अक्षय कुमारही विदेशात असल्याने तोही या लग्नाला हजर राहू शकलेला नाही.
दरम्यान विरल भयानी इन्टाग्रामवर दोघांच्या लग्नाआधीच्या डेट नाईट पार्टीचे व्हिडिओ व्हायरल झाले आहे. लग्नाला कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला हाेता. न्ही कुंटूबियांनी या लग्नाची जोरदार तयारी केली हाेती. दरम्यान हा विवाहातील संगीत सेरेमनीच्या कार्यक्रम पार पडला आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.
हेही वाचा :
- Parineeti-Raghav Wedding : परिणीती -राघव यांच्या लग्नाचा विधी सुरू; पार पडले सूफी नाईट
- Parineeti-Raghav Pre wedding : राघव-परिणीतीच्या विवाहाची जय्यत तयारी
- Parineeti -Raghav | परिणीती चोप्रा-राघव चड्ढा यांनी घेतले महाकालचे दर्शन (व्हिडिओ)
( video : viralbhayani insragram वरून साभार)
View this post on Instagram