Dev Kohli : मैंने प्यार किया, बाजीगर चित्रपटासाठी गाणी लिहिणारे गीतकार देव कोहली यांचे निधन | पुढारी

Dev Kohli : मैंने प्यार किया, बाजीगर चित्रपटासाठी गाणी लिहिणारे गीतकार देव कोहली यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : मैंने प्यार किया, जुड़वा 2, मुसाफिर, शूट आउट एट लोखंडवाला, टॅक्सी नंबर 911, बाजीगर, चित्रपटासाठी गाणी लिहिणारे गीतकार देव कोहली यांचे निधन झाले. (Dev Kohli) ते ८२ वर्षांचे होते. (Dev Kohli) मैंने प्यार किया, जुडवा २, मुसाफिर, शूट आऊट ॲट लोखंडवाला, टॅक्सी नंबर ९११, बाजीगर यासारख्या चित्रपटासाठी गाणी लिहिणारे बॉलीवूडचे दिग्गज गीतकार देव कोहली यांचे आज शनिवार दि. २६ रोजी निधन झाले. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये शंभरहून अधिक हिट चित्रपटांसाठी गाणी लिहिली होती.

देव कोहली यांना श्वासा संबंधी आजार होते. दोन-तीन महिने ते अंधेरी येथील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल होते. अनेक उपचारानंतरही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. १० दिवसांपूर्वा त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. आज सकाळी चार वाजता झोपेत त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने चित्रपट इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

देव कोहली यांनी १०० हून अधिक चित्रपटांसाठी लिहिली गाणी

देव कोहली यांनी ‘लाल पत्थर’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके हैं कौन’, ‘बाजीगर’, ‘जुडवा 2’, ‘मुसाफिर’, ‘इश्क’, ‘शूट आउट ॲट लोखंडवाला’, ‘टॅक्सी नंबर 911’ यासारख्या चित्रपटासाठी गाणी लिहिली होती. त्यांची गाणी सुपरहिट जाली होती. सलमान खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘मैंने प्यार किया’साठी कबूतर जा जा, आजा शाम होने आई, आते-जाते हंसते गाते, कहे तोसे सजना यासारखी सुपरहिट गाणी लिहिली होती.

गीत गाता हूं मैं (लाल पत्थर) माई ना माई मुंडेर पर तेरी बोल रहा है कागा (हम आपके हैं कौन), ये काली काली आंखें (बाजीगर), चलती है क्या नौ से बारह (जुडवा २), ओ साकी साकी (मुसाफिर) यासारखी तमाम हिट गाणी देव कोहली यांनी लिहिली. देव कोहली यांनी अन्नू मलिक, आनंद मिलिंद, आनंद राज आनंद यासारख्या तमाम दिग्गज संगीतकारांसोबत काम‌ केलं होतं.

देव कोहली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

देव कोहली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार आज मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमी येथे केले जाईल. दर्शनासाठी त्यांचे पार्थिव मुंबईतील लोखंडवाला यतील निवासस्थानी दुपारी २ वाजल्यापासून ठेवण्यात येईल.

Back to top button