Trupti Desai : बिग बॉसच्या घरातून बाहेर, लवकरच राजकारणात येणार
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांना भेटायला कलर्स मराठी परिवरातील सदस्य गेले होते. यावेळी जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा आणि मल्हार यांनी घरातील सदस्यांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. मीरा – जय, विशाल – मीरा आणि दादूस – मीनल – नीथा यांनी एकापेक्षा एक असे performance सादर केले. तर, विशाल आणि सौरभ यांनी त्यांच्या काही आठवणी शेअर केल्या. घरातील सदस्यांचे त्यांनी कौतुकदेखील केले. याचसोबत सदस्यांना त्यांच्या घरून आलेले गिफ्ट्स मिळाल्याने दिवाळीचा हा आनंद द्विगुणित झाला. या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल मीनल आणि विशाल सेफ झाले. Trupti Desai या घराबाहेर गेल्या. Trupti Desai या आता लवकरचं राजकारणात प्रवेश करणार आहेत.
याचसोबत बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या फन्सची चुगली चुगली बूथद्वारे स्नेहा, विशाल यांना सांगितली. विकास, जय आणि विशाल यांनी बिग बॉसच्या चावडीमध्ये VOOT द्वारे आलेल्या प्रेक्षकांची अतरंगी डिमांड पूर्ण केली.
आता जय, सोनाली आणि तृप्ती देसाई या तीन जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. जय दुधाणे आणि तृप्ती देसाई हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले महेश मांजरेकरांनी सांगितले.
तृप्ती देसाई यांना या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. घरातील सदस्यांना अश्रू अनावर झाले.
कसा असणार नवा आठवडा? कोणते सदस्य होणार नॉमिनेट? कोणकोणते नवे टास्क घरामध्ये रंगणार? जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोम ते रवि रात्री ९.३० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर.

