

जम्मु कश्मीरच्या श्रीनगरमध्ये काल रविवारी दहशतवाद्यांनी एका पोलिस कर्मचाऱ्यावर गोळीबार केला. यात पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. श्रीनगर शहराच्या बटमालू परिसरात दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
या हल्ल्यात पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. या पोलिस कर्मचाऱ्याला एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.
दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सने श्रीनगर मधील या हल्ल्याचा निषेध केला आहे. पक्षाने ट्विट केले आहे. "श्रीनगरच्या बटमालू येथे २९ वर्षीय पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध करतो ज्यात त्यांचा जीव गेला. दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत आमच्या संवेदना आहेत." अस या ट्विटमध्ये म्हटलं आहे.