srk : शाहरूख खानचा गुपचूप दिल्ली दौरा! | पुढारी

srk : शाहरूख खानचा गुपचूप दिल्ली दौरा!

मुंबई : वृत्तसंस्था

ड्रग्ज प्रकरणानंतर माध्यमांपासून दूर असणारा अभिनेता शाहरुख खानने (srk) दिल्ली दौरा केल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुंबईत परतल्यानंतर कलीना विमातळावरून बाहेर पडताना त्याने छत्रीआड तोंड लपविल्याचे दिसून येत आहे. (srk)

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहरुख खान शनिवारी आपल्या खासगी विमानाने दिल्लीला गेला होता. तेथील एक मिटिंग संपवून रविवारी तो मुंबईत परतला. येथील कलीना विमानतळावरून बाहेर पडताना त्याने माध्यमांना टाळण्यासाठी छत्रीची मदत घेतली.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत दोन व्यक्‍ती छत्री तोंडासमोर धरून विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत. यातील एक शाहरुख खानच असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. यावेळी त्याची टीमही त्याच्यासोबत विमानतळावर होती. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर झाला आहे.

Back to top button