अबोल प्रीतीची अजब कहाणी : राजवीर-मयूरी जाणार टिटवाळा गणपतीच्या दर्शनाला

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ मालिकेतील राजवीर आणि मयूरी यांची हटके जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. गणेशोत्सवात राजवीर सराफ याच्या घरचे टिटवाळा येथील पुरातन कालीन सिद्धीविनायक महागणपती मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी जातात. शकुंतला आणि दुष्यंत यांच्या प्रेमाचा एकमेव साक्षीदार असलेल्या या महागणपतीस विवाहविनायक असे म्हटले जाते. यंदा राजवीरदेखील आपल्या कुटुंबासोबत महागणपतीच्या दर्शनाला जाणार आहे. राजवीरसोबत भाऊसाहेब म्हणजे बॉडीगार्ड देखील जातो. मात्र, मनोमन राजवीरला मयूरी आपल्या सोबत असती तर किती छान झाल असतं? असा विचार करतो.
- ‘अप्पी आमची कलेक्टर’ ते ‘तू चाल पुढं’पर्यंत मालिकांमध्ये उत्सव गणरायाचा
- लंडन फॅशन वीक : अभिमानाने मानुषी छिल्लरने भारताचे केले प्रतिनिधित्व
- Sukhee : शिल्पा शेट्टीच्या ‘सुखी’ चित्रपटाची चर्चा!
तेव्हा असं काहीतरी तरी घडतं की भाऊसाहेब वेश बदलून मयुरीच्या वेशात येतो अन् राजवीर आणि मयूरी दोघेजण एकत्र या गणपतीच्या दर्शनाला जातात. राजवीर – मयूरी एकत्र गणपतीच्या दर्शनाला गेल्यावर नक्की काय होतं? मालिकेत पुढे काय होणार? आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मयूरी आणि राजवीर एकत्र येतील का? हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’.