‘अप्पी आमची कलेक्टर’ ते ‘तू चाल पुढं’पर्यंत मालिकांमध्ये उत्सव गणरायाचा | पुढारी

'अप्पी आमची कलेक्टर' ते 'तू चाल पुढं'पर्यंत मालिकांमध्ये उत्सव गणरायाचा

पुढारी ऑनलाईन डेस्क : या वर्षीचा गणेश उत्सव खूप जबरदस्त असणार आहे. कारण दरवर्षी प्रमाणे यावर्षीही झी मराठी घेऊन येत आहे ‘उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा’. लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून त्याच्या आगमनाच्या तयारीसाठी सगळ्यांनी कंबर कसली आहे. गणपती हा विघ्नहर्ता आहे, ६४ कलांचा अधिपती आहे. मग या गणेशोत्सवात मालिकेतील कलाकार मंडळी कशी मागे राहतील.

‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘सारं काही तिच्या साठी’, ‘तू चाल पुढं’,‘तुला शिकवीन चांगलाच धडा’,‘दार उघड बये’, ‘नवा गडी नवं राज्य’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘३६ गुणी जोडी’,‘चला हवा येऊ द्या’आणि ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या छोट्या स्पर्धकांनी सुद्धा गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरु केली आहे.

अप्रतिम सूत्रसंचालन, सुंदर गायकी व बहारदार नृत्य या सर्व कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.

 

Back to top button