लंडन फॅशन वीक : अभिमानाने मानुषी छिल्लरने भारताचे केले प्रतिनिधित्व | पुढारी

लंडन फॅशन वीक : अभिमानाने मानुषी छिल्लरने भारताचे केले प्रतिनिधित्व

पुढारी ऑनलाईन डेस्क : मानुषी छिल्लर सध्या एका खास कारणांमुळे चर्चेत आहे आणि ते म्हणजे मिस वर्ल्ड असलेला ही बॉलीवूड अभिनेत्री लंडन फॅशन वीक २०२३ मध्ये तिने पदार्पण केलं आहे. सगळ्या भारतीयांसाठी ही बाब नक्कीच अभिमानास्पद आहे यात शंका नाही.

मानुषी छिल्लर म्हणते, “जेव्हा आपण स्पर्धांमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण काय तयारी करावी आणि स्वतःला कसे सादर करावे यावर लक्ष केंद्रित करतो. पण जेव्हा स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाते तेव्हा तुम्ही तुमच्या देशाचे प्रतिनिधित्व करत असता आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या मातृभूमीचे प्रतिनिधित्व करताना येणारी जबाबदारी आणि अभिमान अधोरेखित करते.”

मानुषी छिल्लरसाठी हा एक फॅशन वीक नसून भारताला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्यासारखे आहे. देशाची समृद्ध संस्कृती, विविधता आणि प्रतिभा जगासमोर दाखवण्याबद्दल आहे. तिचे हे मत राष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे हा एक सन्मान आहे जो मोठ्या जबाबदारीसह येतो असं तिला वाटतं.

यावेळी ती प्रसिद्ध डिझायनर रॉकी स्टारच्या अनोख्या पोषाखात ती दिसली. तिच्या हटके फॅशन सेन्ससह मानुषी सातत्याने चर्चेत असते. मानुषी छिल्लर केवळ तिच्या ट्रेंडसेटिंग शैलीमुळे फॅशन आयकॉन नाही तर अनेक फॅशन इव्हेंटमध्ये ती सक्रिय राहते आणि आपल्या फॅशन ची झलक प्रेक्षकांना दाखवते. तिने अनेक फॅशन वॉकमध्ये भाग घेऊन जागरूकता वाढवण्यासाठी आणि सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी तिच्या फॅशनचा उपयोग केला.

ती आगामी यशराज फिल्म्स प्रोडक्शन ” द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये ” प्रतिभावान विकी कौशलसोबत स्क्रीन शेअर करणार आहे सोबतीने ऑपरेशन व्हॅलेंटाईनमध्येदेखील ती दिसणार आहे. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ती तिच्या दुसऱ्या चित्रपटासाठी तयार आहे. माजी मिस युनिव्हर्स सोशल मीडियावर आपला जलवा कायम ठेवला आहे आणि फॅन्ससोबत एकापेक्षा एक फोटो शेअर करत आहे. साडी, गाऊन असो वा शॉर्ट वेस्टर्नमध्ये छिल्लर खूप सुंदर दिसते. स्टाईलच्या बाबतीत ती कुठेच कमी नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे तिचा ग्रीन आऊटफिट. लेटेस्ट फोटोमध्ये मानुषी छिल्लरला पाहून फॅन्स प्रतिक्रिया देत आहेत.

Back to top button