Kareena Kapoor : राष्ट्रगीत गाताना करीना ट्रोल, संतप्त नेटकऱ्यांनी सुनावले (Video) | पुढारी

Kareena Kapoor : राष्ट्रगीत गाताना करीना ट्रोल, संतप्त नेटकऱ्यांनी सुनावले (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : : करीना कपूरचा (Kareena Kapoor) एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूरने राष्‍ट्रगीत गाताना असा काही प्रकार केला की, नेटकरी तिला ट्रोल करत आहेत. खरंतर, करीना कपूर ही आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटानंतर एकदा पुन्हा वापसी करण्याची तयारी करत आहे. परंतु, यावेळी अभिनेत्री करीना मोठ्या पडद्यावर नाही तर ओटीटीवर धुमाकूळ घालणार आहे. करीना कपूर ओटीटी वेब सीरीज ‘जाने जान’ मध्ये दिसणार आहे. ही वेबसीरीज नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. आता या वेब सीरीजचा ट्रेलरदेखील रिलीज झाला आहे. (Kareena Kapoor)

यादरम्यान, करीना कपूर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलीय. आपल्या ॲटीट्यूडवरून नेहमी ट्रोल होणाऱ्या करीना कपूरवर ट्रोलर्स यावेळी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत.

करीना कपूरच्या या प्रकारानंतर भडकले चाहते

करीना कपूर नुकताच महिलांशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. करीना कपूर या इव्हेंटमध्ये लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये पोहोचली होती. आधी ट्रोलर्सनी करीना कपूरच्या ड्रेसवरून ट्रोल केलं. हा व्हिडिओ पाहून ट्रोलर्स संतापले. या व्हिडिओमध्ये करीना कपूर काही महिलांसोबत राष्ट्रगीत गाताना दिसते. यावेळी ती सावधान पोझिशनमध्ये न उभारता हातावर हात ठेवून उभारते. राष्ट्रगीत गातानाचा हा प्रकार पाहून ट्रोलर्स संतापले. करीना कपूरचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

करीना कपूरच्या या व्हिडिओवर नेटकरी खूप कॉमेंट्स करत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी म्हटलं की, अभिनेत्रीला हेदेखील माहिती नाही की, राष्ट्रगीत वेळी कसे उभारायचे असते. तर आणखी एकाने म्हटले की, ‘काय इथेदेखील तुम्ही अभिनय करत आहात.’ काही फॅन्स करीना कपूरची बाजू घेताना दिसले.

video- Chaudhary Mayur x (twitter )वरून साभार

Back to top button