Prachi Desai Birthday
Prachi Desai Birthday

Prachi Desai Birthday : ‘जन्नत २’ फेम प्राची देसाई गेली तरी कोठे?

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री प्राची देसाईने मालिकेसोबत अनेक हिंदी चित्रपटात अभिनयाची मोहर उमठविली. प्राची आणि बॉलिवूड अभिनेता इमरान हासमीसोबत 'जन्नत २' आणि 'अजहर' यासारख्या चित्रपटातून प्रकाश झोतात आली आहे. परंतु, एकापेक्षा एक भारदस्त चित्रपट साकारूनदेखील प्राचीला म्हणावे तसे ग्लॅमरस मिळाले नाही. कालातरांने प्राची चित्रपट झगमटापासून दूर गेली. आज प्राची देसाईचा ३५ वा वाढदिवस ( Prachi Desai Birthday ) आहे. यामुळे जाणून घेवूयात तिच्याविषयी…

प्राचीने तिच्या करिअरमध्ये 'रॉक ऑन', 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई,' 'बोल बच्चन', 'अजहर' आणि 'एक विलेन' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. यासोबत तिची छोट्या पडद्यावरील 'कसम से' मालिका खूपच गाजली. मात्र, तिला म्हणावे तसे ग्लॅमरस मिळाले नाही. कालातरांने प्राची सिने झगमटापासून दुर निघून गेली.

प्राची सोशल मीडियावर सक्रिय असून तिने तिच्या वैवाहिक जीवनातील अनेक खुलासे केले आहेत. यात तिने एका मुलाखतीत पार्टनरसाठी अनेक देशांत फिरून आल्याची माहिती दिली आहे. प्राची एका मुलाला डेट करत होती. दरम्यान ती त्याच्यासोबत फोनवरून बोलत असे. दरम्यान प्राचीने कोठे आहेस असे विचारल्यावर त्याने अनेक देशांची नावे सांगितली. यानंतर प्राचीने त्याला सरपाईज देण्यासाठी म्हणून तेथे जात होती. मात्र, त्या देशांत गेल्यावर तिला डेट करत असलेल्या मित्राने तिला फसवल्याचे समजत होते. यानंतर प्राची त्या देशांत मनमुराद फिरण्याचा आनंद लुटत होती. असे प्राचीने सांगितले आहे. ( Prachi Desai Birthday )

हेही वाचा  : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news