Sooryavanshi : बोल्ड एटीएस अधिकारी निहारिका रायजादा कोण आहे? | पुढारी

Sooryavanshi : बोल्ड एटीएस अधिकारी निहारिका रायजादा कोण आहे?

पुढारी ऑनलाईन :

अक्षय कुमार-कॅटरीना कैफचा सूर्यवंशी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटामध्ये कॅटरीना कैफसोबत आणखी एक सुंदर अभिनेत्री दिसते. ती म्हणजे निहारिका रायजादा. तिने ताराची भूमिका साकारलीय. निहारिका रायजादा, सूर्यवंशी मध्ये अक्षय कुमारच्या टीममध्ये आहे. एक एटीएस अधिकारीच्या भूमिका तिने साकारली आहे. ती रिअल लाईफमध्येही बोल्ड आणि ग्लॅमरस आहे.

ओपी नय्यर यांची नात

निहारिका ही संगीत दिग्दर्शक ओ पी नय्यर यांची नात आहे. तिने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलंय.

मिस इंडिया यूके २०१०

निहारिका मिस इंडिया यूके २०१० आहे. याशिवाय ती मिस इंडिया वर्ल्डवाईड २०१० मध्ये रनर अप देखील राहिली होती. निहारिकाने न्यू-यॉर्क चित्रपट ॲकॅडमीमधून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. आणि मॉडलिंगमधून आपल्या करिअरला सुरुवात केली.

युरोपमध्ये लहानपणीची मोठी झालेल्या निहारिकाने आपले शिक्षण Luxembourg मध्ये पूर्ण केले. आणि मॉडलिंगसोबत अभिनयाच्या दुनियेत विश्वात एंट्री केली.

२०१३ मध्ये डेब्यू

निहारिकाने २०१३ मध्ये बंगाली चित्रपटातून डेब्यू केला होता. त्यानंतर टोटल धमाल आणि मसान या चित्रपटांमध्येही तिनं काम केलं.

 

व्यवसायाने डॉक्टर

निहारिका व्यवसायाने एक डॉक्टर आहे. अभिनयाची आवड असल्याने ती चित्रपटांमध्ये आली. तिने एक गुजराती चित्रपटदेखील केला आहे.

रिअल लाईफमध्ये खूप बोल्ड

निहारिका रिअल लाईफमध्ये खूप बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. इन्स्टाग्रामवर तिचे फॉलोअर्स आहे.

 

Back to top button