

दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचारी संप सुरु असल्याने मुंबई उच्च न्यायालयाकडून फटकारले आहे. कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कामावर हजर न झाल्यास पोलिसांना कारवाई करण्यास आदेश द्यावे लागतील असा इशारा न्यायालयाने यावेळी दिला. न्यायालयाने कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेला सुद्धा फटकारले आहे.
न्यायालयाने सणासुदीच्या काळात संप करून सामान्य जनतेला वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया न्यायालयाने दिली. कर्मचाऱ्यांच्या ज्या काही मागण्या असतील त्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारला समिती स्थापन करण्यासाठी निर्देश देऊ असेही न्यायालयाने म्हटले आहे. संपाच्या विरोधात एसटीकडून न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी आम्हाला संप पुढे न्यायचा नाही असे सांगितले आहे. एसटी संकटात आहे हे आम्हाला ठावूक आहे. दिवाळीच्या सणात लोकांना त्रास होवू नये ही आमची भूमिका आहे पण काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे संप सुरु आहे. ८५ टक्के बस रस्त्यावर आहेत, १५ टक्के लोकांनी संपाची भूमिका घेतली आहे. संस्थेच्या आणि लोकाच्या हितासाठी हा विषय एकदाचा संपवावा. कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा असे आवाहन शरद पवार यांनी केले.
पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे काही पथ्य पाळावी लागत आहेत. राज्य सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत आहे. याचा परिणाम कोरोना रुग्णांची संख्या दिवसेदिवस कमी होते आहे. यंदाची दिवाळी भेटावे का नाही असे वाटत होते. मात्र भेटीचा आनंद घेता आला पाहिजे. आज मास्क लावून सोशल डिस्टंसिंग ठेवून शुभेच्छा घेतल्या, शुभेच्छा दिल्या याचे समाधान आहे. मागील कोरोना काळात पूर्ण आर्थिक नुकसान झाले. आता उद्योग व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. त्यातून नुकसान भरुन निघून दिलासा मिळेल.
हे ही वाचलं का?