Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम दया बेन आहे इतक्या कोटींची मालकीण | पुढारी

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम दया बेन आहे इतक्या कोटींची मालकीण

मुंबई; पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) ही मालिका चाहत्यांच्या घरांघरात पोहोचली आहे. या मालिकेतील जेठालाल, बबिता, बागासोबत दया बेनच्या भूमिकेने चाहते भारावून गेले आहेत. या मालिकेतील गाजलेले दया बेन पात्राची भूमिका अभिनेत्री दिशा वाकानी हिने साकारली आहे. परंतु, माहिती आहे का? ती या भूमिकेसाठी किती रक्कम घ्यायची आणि किती कोंटीची मालकीण आहे. तर मग जाणून घेवूयात…

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) दया बेन उर्फ ​​दिशा वाकानीची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस उतरली. अजूनही चाहते दया बेनच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. नुकतेच दिशाने आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर ती या शोमधून बाहेर पडली. सध्या या मालिकेत ती नाही. परंतु, ती सोशल मीडियावर नेहमी अपडेटस देत असते.

दिशा वाकानीने आपल्या करिअरमध्ये अनेक चित्रपट आणि गाजलेल्या मालिकेत अभिनयाची छाप सोडली आहे. तिने ‘देवदास’, ‘मंगल पांडे: द राइजिंग’, ‘जोधा अकबर’, ‘सी कंपनी’, ‘लव स्टोरी २०५०’ यासारख्या चित्रपटात धमाकेदार भूमिका साकारल्या आहेत. तिने ‘खिचडी’, ‘हीरो भक्ति ही शक्ति है’ आणि ‘आहट’ या मालिकेतदेखील काम केलं आहे. याशिवाय दिशाने अनेक टीव्ही जाहिरातींमध्येही काम केले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील दया बेनच्या भूमिकेने ती प्रकाश झोतात आली. नुकतेच मिळालेल्या माहितीनुसार, तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये प्रत्येक एपिसोडसाठी दिशाला एक ते दीड लाख रुपये दिले जात होते. यामुळे २०१७ मध्ये ती दरमहा २० लाख कमवत होती. तिची एकूण संपत्ती ३७ कोटी असल्याचेदेखील वृत्त समोर आहे. याशिवाय तिच्याकडे बीएमडब्ल्यू कार देखील आहे. यावरून दिशा कोट्यवधींची मालकीण असल्याचे निदर्शनास येत आहे.

दिशा वाकाणीने अभिनयासोबत नाट्यकलेचे शिक्षण घेतले आहे. तिने मयूर पहाडी याच्याशी २०१५ मध्ये विवाह बंधनात अडकली. यानंतर नोव्हेंबर २०१७ रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. याच दरम्यान दिशा तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतून बाहेर पडली. सध्या सोशल मीडियावर सक्रिय असून ती नेहमी आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Disha Vakani (@disha.vakani)

Back to top button