राशिभविष्य (दि. ५ नोव्हेंबर २०२१) | पुढारी

राशिभविष्य (दि. ५ नोव्हेंबर २०२१)

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष- कौटुंबिक वादविवाद मिटतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस. प्रवासाचे योग. जोडीदाराची साथ लाभेल. मनासारख्या घटना घडतील.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ- शत्रू नामोहरम होतील. आर्थिक प्रगती होईल. पदोन्‍नतीचे योग. जबाबदारी वाढेल. सज्जनांचा सहवास लाभेल. नोकरदारांच्या कामाचे कौतुक होईल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन- जुन्या गुंतवणुकीत नुकसान होण्याची शक्यता. ठरवलेल्या कामांत अडचणी येतील. गुंतवणुकीस अयोग्य दिवस. प्रेम प्रकरणात अपयश येण्याची शक्यता.
राशिभविष्य
कर्क

कर्क- वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या कामात अडचणी येतील. विषय समजून प्रतिक्रिया द्या. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. कामाचे नियोजन करा.
राशिभविष्य
सिंह

सिंह- आत्मविश्‍वास वाढवणार्‍या घटना घडतील. कलाकार व लेखकांना लाभदायक दिवस. मित्रमंडळींच्या सहकार्याने कामांना गती मिळेल. इच्छापूर्ती होईल.
राशिभविष्य
कन्या

कन्या- आरोग्याच्या तक्रारी. आत्मविश्‍वास महत्त्वाचा. वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता.

राशिभविष्य

राशिभविष्य
तुळ

तूळ- आवडत्या मित्रमंडळींचा सहवास लाभेल. अतिथ्यात दिवस जाईल. खरेदीचे योग. एकंदर लाभदायक दिवस.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्‍चिक- कर्जदार तगादा लावतील. संभ्रमावस्था निर्माण होईल. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. संयम, स्वावलंबन आवश्यक आहे.
राशिभविष्य
धनु

धनु- प्रेम प्रकरणात यश येईल. प्रवास घडतील. मनापासून केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. प्रामाणिकपणा व सचोटीने यशाकडे वाटचाल कराल.
राशिभविष्य
मकर

मकर- प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक प्रगती होईल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. लोकानुकूलता प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ- नियमांचे पालन आवश्यक आहे. आत्मचिंतनाची गरज. द्विधा मनःस्थिती. आरोग्याच्या द‍ृष्टीने प्रतिकूल दिवस. श्रद्धा व संयम महत्त्वाचा आहे.
राशिभविष्य
मीन

मीन- मनाविरुद्ध घटनांचा अनुभव येईल. वादविवादापासून दूर राहा. उष्णतेचे विकार होण्याची संभावना. जुने वाद उफाळून येतील. संतुलन साधणे फार महत्त्वाचे आहे.

Back to top button