

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ सुपरस्टार चिरंजीवीचा २२ ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. या औचित्याने त्याच्या फॅन्ससाठी एक खुशखबर आहे. यूवी क्रिएशन्सने चिरंजीवीच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव मेगा १५७ असे आहे. (Mega 157) चिरंजीवीच्या पुढील चित्रपटाची सोशल मीडियावर घोषणा करण्यात आलीय. (Mega 157) चिरंजीवीला लाखो चाहते सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. त्यांच्या नव्या चित्रपटाचा पोस्टर शेअर करण्यात आला आहे. (chiranjeevi )
प्रोडक्शन हाउस यूवी क्रिएशन्सने पहिल्या पोस्टरसोबत ट्विटरवर वृत्त शेअर केले. त्यांनी लिहिलंय-यावेळी, हे ब्रह्मांडच्या पलिकडे आहे. पाच तत्व मेगास्टारसाठी एकत्र होतील. यूवी क्रिएशन्सच्या बॅनरअंतर्गत आणि वी वामसी कृष्णा रेड्डी, प्रमोद उप्पलपति आणि विक्रम रेड्डीद्वारा मोठ्या पातळीवर बनवले जात आहे. चिरंजीवीच्या करिअरची सर्वात महागडा हा चित्रपट असेल.
अलिकडेच चिरंजीवी 'भोला शंकर' मध्ये दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेहर रमेश यांनी केलं आहे. यामध्ये मेगास्टार चिरंजीवी मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटामध्ये कीर्ति सुरेश, तमन्ना भाटिया प्रमुख भूमिकेत आहेत. सुशांत, वेनेला किशोर, तरुण अरोडा, मुरली शर्मा, तुलसी, श्री मुखी आणि अन्य सहायक भूमिकेत कलाकार आहेत.