Nagchandreshwar Mandir : वर्षातून एकदाच उघडते उज्जैनचे प्रसिद्ध नाग मंदिर, काय आहे खासियत?

Nagchandreshwar Mandir
Nagchandreshwar Mandir
Published on: 
Updated on: 

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशात शतकानुशतके नागाची पूजा करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात नागांचे अनेक प्रसिद्ध मंदिरेही आहेत. यापैकी एक आहे- उज्जैनमधील नागचंद्रेश्वर मंदिर. उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वर मंदिर आहे. (Nagchandreshwar Mandir) या मंदिराची सर्वात मोठी खासियत ही आहे की, केवळ नागपंचमीच्या दिवशी दर्शनासाठी हे मंदिर उघडले जाते. (Nagchandreshwar Mandir)

असे म्हटले जाते की, नागराज तक्षक स्वत: या मंदिरात आहेत. त्यामुळेच केवळ नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर उघडून नाग देवतेची पूजा-अर्चना केली जाते. नागचंद्रेश्वर मंदिरात ११ व्या शतकातील मूर्ती आहे आणि असा दावा केला जातो की, अशी मूर्ती जगभरात कुठेही नाही. ही मूर्ती नेपाळहून आणण्यात आली होती.

नागचंद्रेश्वर मंदिरात भगवान शंकर नागावर विराजमान आहेत. मंदिरात स्थापित केलेली प्राचीन मूर्ती, भगवान शिव, भगवान गणेश आणि माता पार्वती यांच्यासह दशमुखी नागावर विराजमान आहेत. पौराणिक मान्यतेनुसार, सर्पराज तक्षक यांनी भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. सर्पराजाच्या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग त्यांनी नागांचा राजा तक्षक नाग याला वरदान म्हणून अमरत्व दिले. तेव्हापासून तक्षक राजा परमेश्वराच्या सान्निध्यात राहू लागला.

या प्राचीन मंदिराची उभारणी परमार राजा भोजने इ. स. १०५० च्या आसपास केली होती. यानंतर सिंधिया घराण्याचे महाराज राणोजी सिंधियाने १७३२ मध्ये महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यावेळी या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला होता. नागराजवर विराजमान भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक वर्षाची प्रतीक्षा करतात.

रिपोर्टनुसार, भगवान नागचंद्रेश्वरची त्रिकाल पूजेची परंपरा आहे. त्रिकाल पूजेचा अर्थ तीन वेगवेगळ्या समयी केलेली पूजा होय. पहिली पूजा मध्यरात्रीला महानिर्वाणी, दुसरी पूजा नागपंचमीच्या दिवशी दुपारी प्रशासनद्वारा केली जाते. तिसरी पूजा नागपंचमीच्या सायंकाळी भगवान महाकालच्या पूजेनंतर मंदिर समिती करते. पुन्हा रात्री १२ वाजता एक वर्षासाठी दरवाजे बंद केले जातात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news