Prakash Raj : द्वेषाने फक्त द्वेषच दिसतो, टीकेनंतर प्रकाश राज यांचे स्पष्टीकरण | पुढारी

Prakash Raj : द्वेषाने फक्त द्वेषच दिसतो, टीकेनंतर प्रकाश राज यांचे स्पष्टीकरण

पुढारी ऑनलाईन डेस्क : चांद्रयान ३ च्या लँन्डिंगवरून व्यंगचित्र शेअर केल्यानंतर प्रकाश राज यांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. अभिनेते प्रकाश राज यांचे म्हणणे आहे की, केवळ द्वेषाने द्वेषच दिसते. ट्रोलर्सनी कोणत्या चहावाल्याला पाहिले? (Prakash Raj) जर तुम्हाला चेष्टा समजत नसेल तर ही चेष्टा तुच्यावरच आहे. ‘चांद्रयान-३’ शी तुलान करून व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर करणे प्रकाश राजवर भारी पडले होते. हा फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर ट्रोलर त्यांना खूप ट्रोल करत आहेत. सोशल मीडिया युजरनी त्यांच्यावर चांद्रयान-३ मिशनची खिल्ली उडवल्याचा आरोप केला आहे. (Prakash Raj)

प्रकाश राज यांनी सोशल मीडिया एक्स (ट्विटर) ‍वर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये लुंगी आणि शर्ट घातलेला एक माणूस (व्यंगचित्र) एक कार्टून स्वरुपात दाखण्यात आले आहे. दोन मगामध्ये चहा ओतताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शनमध्ये लिहिलं की, विक्रमलँडरने चंद्रमावरून पहिला फोटो पाठवला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करणे सुरू केलं.

नेटकऱ्यांनी एक फोटो शेअर करत म्हटले आहे, तुम्ही शास्त्रज्ञांची खिल्ली उडवत आहात. चांद्रयान मिशन….इस्रोचे आहे. जर यश मिळाले तर भारत देशाचे यश असेल. कोणत्याही पक्षाचे नाही. तुमची इच्छा आहे की की, हे मिशन अयशस्वी व्हावं? इस्रो अनेक वर्षे राहील. नेहमी आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल.

दुसऱ्या युजरने लिहिलं, ‘तुम्ही विक्रम लँडरवर टीका करत आहात. ज्याचे नाव आमच्या अंतरिक्ष कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांच्यावर ठेवण्यात आले आहे.’

 

 

Back to top button