Singer Raju Punjabi : ‘देसी देसी ना बोल्या कर’ हिट गाणी देणारा गायक राजू पंजाबीचे निधन | पुढारी

Singer Raju Punjabi : 'देसी देसी ना बोल्या कर' हिट गाणी देणारा गायक राजू पंजाबीचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : देसी देसी ना बोल्या कर…य़ासारखे हिट गाणी देणारा गायक राजू पंजाबीचे निधन झाले. (Singer Raju Punjabi) तो ३३ वर्षांचा होता. राजू पंजाबी मागील १० दिवसांपासून एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्याला कावीळ झाली होती. त्यामुळे यकृत आणि फुफ्फुसात संसर्ग झाला होता. प्रकृती खालावल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. (Singer Raju Punjabi) तो हिसारमधील आजादनगर येथे राहत होता.

त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार राजस्थानाती हनुमानग येथील रावतसर खेडा या गावात केले जाईल.

राजू पंजाबीवर हिसारध्ये उपचार सुरु होते. याआधीही त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर तो घरी परतला होता. पण, तब्येत पुन्हा बिघडल्याने त्याच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. राजू पंजाबी विवाहित अशून त्याला ३ मुली आहेत.

राजू पंजाबी हरियाणा, पंजाब आणि राजस्थानमध्ये प्रसिद्ध चेहरा होता. त्याची सॉलिड बॉडी, सँडल, तू चीज लाजवाब, देसी-देसी यासारखे हिट गाणी आहेत. सपना चौधरीसोबत त्याची जोडी लोकप्रिय होती. त्याने हरियाणामध्य़े म्युझिक इंडस्ट्रीला नवी ओळख दिली.

राजू पंजाबीचे सेवटचे गाणे आपसे मिलके यारा हमको अच्छा लगा था हे १२ ऑगस्ट रोजी रिलीज झाला होता. यादरम्यान तो रुग्णालयात दाखल होता. राजू पंजाबीचे खरे नाव राजा कुमार असे होते. राजू पंजाबीने १९९६ मध्ये भजनपासून सुरुवात केली होती. २०१३ मध्ये यार दोबारा नहीं मिलने या गाण्यात तो प्रकाशझोतात आला होता.

Back to top button