कियाराचा ग्लॅमरस लूक | पुढारी

कियाराचा ग्लॅमरस लूक

कियारा अडवाणी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अलीकडेच तिने एक फोटोशूट केला असून यातील तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली काही छायाचित्रे बरीच व्हायरल होत राहिली आहेत. काळ्या कट-आऊटमधील गाऊनवर तिने केलेले फोटोसेशनचे डिजिटल जगात बरेच कौतुक होत आहे.

कियाराने कॅप्शनमध्ये फक्त ब्लॅक क्लब सूट इमोजी वापरला असून, सर्व छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. यातील कियाराचा एक क्लोज अप लूक असून दुसरा लाँग शॉट आहे. या फोटोशूटमध्ये काही मोनोक्रोम पिक्चरही समाविष्ट आहेत. चाहत्यांनी या तिच्या फोटोसेशनला भरभरून प्रतिसाद दिला आणि तिची मुक्त कंठाने प्रशंसा देखील केली. कियाराने यावेळी आपण 8 महिन्यांची असताना सर्वप्रथम कॅमेर्‍याला सामोरी गेल्याची आठवण विशद केली. जाहिरात क्षेत्रातील पदवीपासून वर्षातील सर्वोत्तम ब्रँड एंडॉर्सर पुरस्कारापर्यंतचा हा प्रवास विलक्षण आहे, असे ती आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते. कियाराने अलीकडेच वाघा सीमारेषेवर एका सोहळ्यात भाग घेतला होता. अलीकडेच तिने एक पुरस्कार जिंकला असून इन्स्टाग्रामवर तिने याबद्दल आपला आनंद व्यक्त केला. ज्यावेळी आपले परिश्रम सार्थकी लागतात, त्यावेळी त्याचा आनंद वेगळाच असतो, अशी प्रतिक्रिया तिने यावेळी नोंदवली. माझ्या सन्मानाबद्दल मी सर्व घटकांचे आवर्जून आभार मानले, असेही ती म्हणाली.

हेही वाचा : 

Back to top button