दीपिकाचा झाडू पोछा, हजरजबाबी शाहरूख | पुढारी

दीपिकाचा झाडू पोछा, हजरजबाबी शाहरूख

हजरजबाबीपणाची देणगी लाभलेला शाहरूख खान अनेकदा यामुळे वातावरण खुलवून टाकतो अन् याचीच प्रचिती आलेला एक व्हिडीओ बराच व्हायरल होत आहे. रोहित शेट्टीच्या चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटाच्या प्रमोशनवेळी घडलेला किस्सा यात समाविष्ट आहे.

या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका पत्रकाराने दीपिकाला घरातील कामाची किती सवय आहे, असा प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना दीपिका म्हणाली होती, ‘सब जानती हूँ. खाना पकाना, बर्तन धोना, साफ सफाई करना, डस्टिंग करना, झाडू पोछा, सब चीज’. यावर शाहरूखने तिला मध्येच थांबवले आणि अगदी समयसूचकतेने तो पत्रकारांकडे कटाक्ष टाकत म्हणाला, ‘हम भी इसे फिल्मो मे अ‍ॅक्टिंग के लिए थोडी ना लेते है? ये आके साफ-सफाई करले, इसलिए इसे फिल्म मे लेते है’!

हेही वाचा : 

Back to top button