Shah Rukh Khan चा डबल धमाका ! आर्यनच्या जामीनानंतर आता तब्बल २०० कोटींची खुशखबर | पुढारी

Shah Rukh Khan चा डबल धमाका ! आर्यनच्या जामीनानंतर आता तब्बल २०० कोटींची खुशखबर

पुढारी ऑनलाईन डेस्क

शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खान नेहमीच चर्चेत असतात. गेल्या २६ दिवसांपासून चिंताग्रस्त असलेल्या शाहरुख खानला काल मोठा दिलासा मिळाला. मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात आर्यनला जामीन मिळाल्याने त्याला स्वत:चे अश्रु आवरता आले नाहीत.

दरम्यान कोरोना महामारीतून परिस्थिती सुधारत असल्याने मोठ्या पडद्यावर आजपासून चित्रपट झळकणार आहेत. येत्या काही दिवसांत या दोन्ही स्टार्सचे मोठे सिनेमे रिलीज होणार आहेत. यावेळी सर्वाधिक चर्चा शाहरुखच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ आणि सलमान खानच्या ‘टायगर 3’ची आहे.

‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ तब्बल २०० कोटींना विकले गेले

आता या दोघांबद्दल बातमी आहे की, रिलीजपूर्वीच त्यांचे ‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ तब्बल २०० कोटींना विकले गेले आहेत. हे शाहरुख खान आणि सलमान खानचे स्टारडम आहे की रिलीजपूर्वीच त्यांचे चित्रपट कोट्यवधी रुपयांची कमाई करतात आणि जेव्हा त्यांचे चित्रपट प्रदर्शित होतात तेव्हा ते बॉक्स ऑफिस रेकॉर्ड देखील मोडतात.

लेट्स ओटीटी ग्लोबलने ट्विट करून शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि सलमान खानच्या चित्रपटांची माहिती दिली आहे. ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, “अमेझॉन प्राइम व्हिडिओने ‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ चे पोस्ट थिएट्रिकल स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत.

अॅमेझॉनने यशराज फिल्म्ससोबत दोन मेगा बजेट अॅक्शन थ्रिलरसाठी ८ आठवड्यांच्या विंडो डीलवर स्वाक्षरी केली आहे. लेट्स ओटीटी ग्लोबलने अशा प्रकारे चित्रपटाच्या रिलीजपूर्वी कमाईची माहिती दिली आहे. याचा अर्थ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर हे चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Amazon Prime Video वर प्रसारित होतील.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंग सेटवरील अनेक छायाचित्रे यापूर्वी व्हायरल झाली होती. या चित्रपटासाठी किंग खाननेही आपला लूक बदलला आहे. ‘पठाण’मध्ये तो दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहमसोबत दिसणार आहे. त्याचबरोबर सलमान खानचा ‘टायगर ३’ २०२२ मध्ये रिलीज होणार आहे. यापूर्वी सलमान आणि कतरिनाने तुर्की आणि रशियामध्येही चित्रपटाचे शूटिंग केले होते. या चित्रपटात इमरान हाश्मीही दिसणार आहे.

हे ही वाचलं का?

Back to top button