Stree 2 Teaser : श्रद्धा कपूर-राजकुमार रावच्या ‘स्त्री-२’ची रिलीज डेट समोर | पुढारी

Stree 2 Teaser : श्रद्धा कपूर-राजकुमार रावच्या 'स्त्री-२'ची रिलीज डेट समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा नवा चित्रपट ‘स्त्री २’ (Stree 2 Teaser ) ची रिलीज डेटची घोषणा करण्यात आलीय. हा चित्रपट पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात चित्रपटगृहात पाहायला मिळेल. चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यात आले आहे. (Stree 2 Teaser )

राजकुमार राव, श्रद्धा कपूरने सोशल मीडिया अकाऊंटवर एक टीजर जारी करत रिलीज डेटची घोषणा केलीय. श्रद्धा कपूरने चित्रपट ‘स्त्री २’ चा टीजर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा टीजर शेअर करताना लिहिलंय, ‘एक बार फिर चंदेरी में फैला आतंक! स्त्री 2 की तैयारियां शुरू हो गई हैं। आ रही है वो अगस्त 2024 में।’

श्रद्धा कपूरने चित्रपटाची घोषणा इन्स्टाग्रामवर केलीय, तेव्हापासून फॅन्सची उत्सुकता वाढलीय. लोकांनी कमेंट्समध्ये कौतुक करणे सुरु केलंय. एका युजरने कमेंट करत लिहिलंय, ‘आता येईल मजा.’ दुसऱ्या युजरने लिहिले, ‘इतकी क्यूट तरुणीला भूत बनवलंय. आता भूताला घाबरायचे की प्रेम करायचे.’

‘स्त्री’ने केली होती दमदार कमाई

श्रद्धा कपूर-राजकुमार राव स्टारर ‘स्त्री’ चित्रपट २०१८ मध्ये रिलीज झाला होता. चित्रपटाचे दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं होतं. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६६ कोटींचा बिझनेस केला होता. या चित्रपटाने वर्ल्डवाईड १८० कोटी रुपये कमावले होते. आता ‘स्त्री २’ किती जादू दाखवेल, हे पाहणे रंजक ठरेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shraddha ✶ (@shraddhakapoor)

Back to top button