Mira Jagannath - आपण बोलून घाण नाही व्हायचं हे मी इथे शिकले : मीरा - पुढारी

Mira Jagannath - आपण बोलून घाण नाही व्हायचं हे मी इथे शिकले : मीरा

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ग्रुपमधील सदस्यांची नाती बदलताना दिसतं आहेत. एकेमेकांवर तितकासा विश्वास राहिलेला दिसून येत नाहीये. कुठंतरी थोडासा दुरावा आला आहे असे जाणवत आहे. जय, उत्कर्ष, मीरा (Mira Jagannath) आणि गायत्री यांचा ग्रुप अगदी पहिल्यापासून चर्चेत आहे. कोणतीही गोष्ट असो ते एकेमकांची साथ द्यायला पुढे मागे बघत नाहीत. कुठलंही कार्य असो वा चर्चा असो हे चौघही एकत्रचं चर्चा करून काय निर्णय घेताना दिसतात पाहुया. पण असे काही घरात घडले आहे ज्यामुळे गायत्री जरा चिंतेत आहे आणि ती हीच गोष्ट आज मीरा जगन्नाथला बोलून दाखवणार आहे. जगन्नाथचं (Mira Jagannath) बोलणं गायत्रीला पटलं असून नक्की असं काय झालं की गायत्रीला असं वाटलं ? ते आजच्या भागामध्ये कळेलच.

गायत्री जगन्नाथला म्हणाली, मी एक ठरवलं आहे मी काही कोणाशी बोलायला जाणार नाहीये. फक्त मी बघणार आहे यावेळेस आणि मग त्याप्रमाणे मी पुढे… जर मी राहिले या शनिवारनंतर तर मग मी त्याप्रमाणे खेळेन. जगन्नाथ म्हणाली, ऑफकोर्स तू राहणार आहेस.

गायत्री म्हणाली,  काहीही होऊ शकतं. मी उत्कर्षला पण हेच म्हणत होते, की जेव्हा आपण ग्रुप ग्रुप म्हणतो तेव्हा चल माझ्यासाठी एकच माणूस खेळू शकतो. तर मग ते तू खेळशील किंवा उत्कर्ष खेळेल मला कोणीही चालेल तो प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा competitor असतात चार लोकं तेव्हा competitor ला देखील आपल्याकडून पाठिंबा नाही मिळाला पाहिजे. ही पण आपलीच duty आहे ना? माझा हा मुद्दा आहे.

जगन्नाथ म्हणाली, म्हणून मी तुला म्हणाले काही गोष्ट या आपल्यातच राहू दे. कारण काय होणार उद्या काही झालं ना हे दोघं एकमेकांना पाठिंबा देणार हे स्पष्ट आहे एकदम जे दिसतं आहे. त्यामुळे याच्यापुढे आपण हे बोलायचे नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय करायचे आहे. प्रत्येकजण इथे सेल्फिश आहे. आपण बोलून घाण नाही व्हायचं हे मी इथे शिकले आहे. त्यामुळे मी बोलणं बंद केलं आहे.

बघूया पुढे अजून काय काय गोष्टी घडल्या घरामध्ये. आजच्या भागामध्ये सदस्यांमध्ये कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्या. तेव्हा पहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का?

Back to top button