बिग बॉस M : आपल्या माणसांचा होऊ शकत नाही तो : जय - पुढारी

बिग बॉस M : आपल्या माणसांचा होऊ शकत नाही तो : जय

मुंबई; पुढारी ऑनलाईन :

अद्भुत नगरात बर्‍याच अद्भुत घटना बघायला मिळत आहेत. बिग बॉस मराठीच्या (बिग बॉस M) घराचे रूपांतर अद्भुत नगरात केल्यानंतर बिग बॉस (बिग बॉस M) यांनी सदस्यांना साप्ताहिक कार्या दरम्यान टास्क दिले आहेत. या टास्क दरम्यान प्रत्येक सदस्याची एक वेगळीच बाजू बघायला मिळत आहेत.

काल जयने स्नेहाला दिलेले कार्य असो, विशालने उत्कर्षला दिलेले कार्य असो वा मीराने मीनलला टक्कल करायला सांगणे असो. अनेक विविध टास्क दिले गेले. बहुतांशी टास्क पूर्ण करण्याचा देवदूत झालेल्या सदस्यांनी प्रयत्न देखील केला. पण, राक्षस बनलेल्या टीमचा विशाल संचालक आहे. त्याने टास्क दरम्यान घेतलेले निर्णय विकास आणि इतर सदस्यांना पटले नाहीत असे दिसून येत आहे.

विशालने विकासला टास्कमधून बाद केल्यानंतर विशाल आणि विकास यांच्यामध्ये मोठा राडा झाला. ज्यामध्ये हे दोघे एकमेकांना बरंच काही बोलून देखील गेले. विशाल हे टास्कमध्ये असे वागतो आहे का? नक्की काय झालं ? कळेल आजच्या भागामध्ये.

दादूसला देखील टास्क मधून बाद केल्यानंतर विकासने त्यावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर विशालने दादूसचे नावं त्याची कारणं सांगत मिटवले. विशालचे म्हणणे आहे मी संचालक आहे त्यामुळे मला सांगू नका. याच वरुन आज जय आणि विशाल मध्ये खूप मोठा राडा होणार आहे.

बघूया आज पुढे होते… कुठेतरी घर VS विशाल असे चित्र दिसते आहे.

विशालचे म्हणणे आहे, “मी संचालक म्हणून मला जे वाटलं ते मी केलं. माझी मर्जी मी केलं. मीरा म्हणाली, योग्य नाहीये हे decision. जय म्हणाला, जेवढं तू खेळलास ना तेवढं बाकी सगळे इथे खेळले आहेत, लक्षात ठेव हे. अशी गोष्ट झाली ना की वाईट वाटतं. अभिमान होता तुझ्यावर आज ते सगळं. आपल्या माणसांचा होऊ शकत नाही तो…”

हा वाद कुठवर गेला. विशाल त्याचा मुद्दा सदस्यांना पटवून देऊ शकेल ? काय होईल टास्कमध्ये आज. जाणून घेण्यासाठी पाहा  बिग बॉस मराठी सीझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

हेही वाचलं का?

Back to top button