

बॉलीवूडची गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) ने एका रिॲलिटी शोच्या वेळी स्वत:च्या गंभीर आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. ती अशा एका गंभीर आजाराने त्रस्त आहे, जे फारचं गंभीर आहे. नेहा कक्कर अशा एका आजाराने त्रस्त आहे, ज्यामुळे ती खूप डिस्टर्ब होते. आपल्या आजाराविषयी बोलताना ती म्हणाली की, तिच्याकडे प्रेम, चांगलं कुटूंब, करिअर, सर्वकाही आहे. परंतु, आपल्या anxiety या आजारामुळे ती खूप चिंतेत आहे. नेहा कक्कर ज्या मानसिक आजाराने त्रस्त आहे, तो फारचं गंभीर आहे.
anxiety कोणकोणत्या पध्दतीने नुकसान पोहोचवतो. हा आजार कसा होता? किती भयानक होऊ शकतो? या प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी मेंटल हेल्थ एक्सपर्ट डॉक्टर विकास खन्नाशी बातचित करण्यात आली.
बॉलीवूडमधील लोकप्रिय गायिंकापैकी एक नेहा (Neha Kakkar) आपल्या पर्सनल लाईफविषयी नेहमीचं खुल्यापणाने बोलते. नेहाने एका रिॲलिटी शोमध्ये सांगितलं होतं की, ती एका आजाराने त्रस्त आहे. आणि त्यामुळे तिला नेहमी अस्वस्थ होतं. anxiety मुळे ती चिंतेत राहते.
विकास खन्ना यांनी सांगितलं की, एंग्जायटी एक मानसिक आजार आहे. जो मानसिक पातळीवर कमकुवत बनवतो. हा मेंदू आणि शरीरालादेखील नुकसान पोहोचवतो. जेव्हा एखादा माणूस एंग्जायटीने त्रस्त असतो. तेव्हा त्याला या गोष्टींची भीती वाटत राहते की, काहीतरी चुकीचं घडणार आहे. या भीतीमुळे पॅनिक ॲटॅक येतो. त्या माणसाचे हृदयाचे ठोके अचानक वाढतात आणि श्वास फुलतो.
पुढे डॉक्टर विकास खन्ना म्हणतात- anxiety डिसॉर्डरने पीडित पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफवर परिणाम होतो. रोजचे जीवन अस्वस्थ होतं. त्या माणसाचे मन कुठल्याही कामात लागत नाही. जर हा आजार दीर्घकाळ असेल तर हा आजार डिप्रेशनमध्ये रुपांतरीत होऊ शकतो. जर हा आजार खूपच गंभीर झाला तर तो माणूस आत्महत्येसारखं पाऊलदेखील उचलू शकतो.
नेहाने अनेकदा आपल्या anxiety विषयी सांगितले आहे.