Do Patti On Netflix: क्रिती सेनॉन झाली निर्माती, ८ वर्षांनंतर काजोल-क्रिती एकत्र

Do Patti On Netflix
Do Patti On Netflix
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आदिपुरुष' मुळे ट्रोल झाल्यानंतर क्रिती सेनॉन पुन्हा एकदा चर्चेत आलीय. एक अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत ९ वर्षे अभिनय केल्यानंतर क्रिती आता निर्मिती क्षेत्रात उतरलीय. (Do Patti On Netflix) तिने दो पत्ती या चित्रपटाची निर्मिती केली असून निर्माती म्हणून ती या क्षेत्रात उतरतेय. तिने आपले प्रोडक्शन हाऊस लॉन्च केले. याची घोषणा तिने स्वत: सोशल मीडिया हँडलवर केली होती. (Do Patti On Netflix)

[toggle title="आठ वर्षांनंतर काजोल-कृती सेनॉन पुन्हा एकत्र" state="close"]क्रितीने बुधवारी निर्माती म्हणून सोशल मीडियावर आपल्या पहिल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेत्री क्रिती 'दिलवाले' चित्रपटानंतर आठ वर्षांनी काजोलसोबत 'दो पत्ती' या चित्रपटात पुन्हा एकत्र काम करणार आहे. इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले असून त्यात काजोल, क्रिती आणखी दोन तरुणी दिसत आहेत.[/toggle]

इन्स्टाग्रामवर काजोलसोबत फोटो शेअर करत क्रितीने लिहिलं आहे, 'दो पत्तीची घोषणा करताना खूप उत्साहित आहे. खूप मजबूत आणि दृढ निश्चय करणारी प्रेरक आणि खूप प्रतिभावान महिला मोनिकासोबत हा चित्रपट आणि अधिक मनोरंजक असेल. आम्हाला ही कहाणी सांगण्यासाठी नेटफ्लिक्सहून अधिक चांगले व्यासपीठ मिळू शकत नाही. आठ वर्षानंतर काजोल मॅमसोबत पुन्हा काम करण्यासाठी सुपर डुपर उत्साहित आहे. कनिका – मला आपलं लेखन नेहमीचं आवडलं आहे आणि मी तुमच्यासोबत पहिला चित्रपट सह-निर्माता बनून खूप खुश आहे. उफ्फ्फ..हे तर खास आहे! ब्लू बटरफ्लाय फिल्म्सचा हा पहिला चित्रपट.'

'दो पत्ती' लेखिका कनिका ढिल्लो आणि अभिनेत्री क्रिती सेनॉनचा निर्मात्या म्हणून हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना रोमांचक सस्पेंसने भरलेली कहाणी दर्शवेल. चित्रपटाच्या कहाणीनुसार, डोंगराळ भागात शूट केला जाईल., 'दो पत्ती' ओटीटी 'नेटफ्लिक्स'वर रिलीज होईल. रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news