Bawaal Teaser: वरुण धवन-जान्हवीच्या रोमान्सने ‘बवाल’, रिलीज होताच… | पुढारी

Bawaal Teaser: वरुण धवन-जान्हवीच्या रोमान्सने 'बवाल', रिलीज होताच...

पुढारी ऑनलाईन डेस्क : वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘बवाल’ च्या घोषणेनंतर सातत्याने चर्चेत आहे. (Bawaal Teaser) या चित्रपटाचे अनेक पोस्टर रिलीज झाले आहेत. आज रोमँटिक-ड्रामा चित्रपट ‘बवाल’चा टीजर रिलीज करण्यात आला आहे. अधिकृतरित्या २१ जुलै रोजी बवालचा एक्सक्लुझिव्ह ग्लोबल प्रीमियरची घोषणा करण्यात आलीय. या टीजरमध्ये रोमँटिक चित्रपटाची जी झलक समोर आलीय, ते पाहून चाहते खूप उत्सुक आहेत. (Bawaal Teaser)

अजय – निशाची लव्ह स्टोरी

चित्रपट ‘बवाल’च्या टीजरमध्ये अजय (वरुण धवन) आणि निशा (जान्हवी कपूर) यांच्यामध्ये प्रेम आणि रोमान्सची झलक दिसते. मनोज मुंतशिर यांचे बोल आणि मिथुन रचित ‘तुम्हें कितना प्यार करते’ गाणे पाहायला मिळणार आहे. अरिजीत सिंहच्या आवाजात हे गाणे शानदार आहे.

वरुण धवनने लखनऊच्या एक शाळेचे शिक्षक अजय दीक्षितची भूमिका साकारलीय. आपल्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे. शहरात त्यांचा खूप आदर होतो. तर जान्हवी कपूर खूप हुशार, पण साधी तरुणी निशाच्या भूमिकेत आहे. पुढील कहाणीसाठी तुम्हाला चित्रपट पहावा लागेल. चित्रपटाचे शूटिंग भारत तसेच दुसऱ्या देशांमध्ये अनेक दमदार लोकेशन्सवर करण्यात आले आहे.

साजिद नाडियाडवालाच्या नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटद्वारा अश्विनी अय्यर तिवारी तसेच नितेश तिवारी की अर्थस्काय पिक्चर्सच्या सहयोगाने निर्मिती करण्यात आली आहे. नितेश तिवारी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

Back to top button