bhagyashree mote Are u lost?❤️❤️ भाग्यश्री मोटेचा सर्वात बोल्ड अंदाज - पुढारी

bhagyashree mote Are u lost?❤️❤️ भाग्यश्री मोटेचा सर्वात बोल्ड अंदाज

पुढारी ऑनलाईन

भाग्यश्री मोटे (bhagyashree mote) ही मराठमोळी अभिनेत्री एका फोटोमुळे चर्चेत आलीय. तिने केलेल्या आतापर्यंतच्या फोटोशूटपैकी हा फोटो खूप बोल्ड आहे. Are u lost? अशी कॅप्शन देत तिने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये भाग्यश्री मोटे (bhagyashree mote) खूप बोल्ड अंदाजात दिसत आहे. शिवाय तिने आपले कुरळे केस मोकळे सोडल्यामुळे ती आणखी सुंदर दिसतेय. चाहत्यांकडूनदेखील या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे. या फोटोत भाग्यश्री अतिशय सुंदर दिसत आहे.

अभिनेत्री भाग्यश्रीने उत्तम अभिनय साकारलाय. सौंदर्याच्या जोरावर तिने प्रेश्रकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. तर तिच्या अभिनयाने गारूड निर्माण केलंय. तिचा एक वेगळा चाहता वर्ग आहे.

मध्यंतरी, भाग्यश्री तिच्या टॅटूमुळे चर्चेत आली होती. आता ती एका नव्या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

दरम्यान, भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्यात तिने म्हटले होते- फिलिंग एकदम कडक. तिच्या फोटोसोबत तिच्या या कॅप्शनची चांगलीच चर्चा रंगली होती. या फोटोवर वीस हजारांहून अधिक लाईक्स मिळाले होते. या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा क्राफ टॉप तर निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केली होती. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

फिटनेस फ्रिक भाग्यश्री

भाग्यश्री फिटनेसला घेऊन सजग असते. टोन बॉडीसाठी ती खूप मेहनत घेते. भाग्यश्रीने देवो का देव, सिया के राम, जोधा अकबर या हिंदी मालिकेत काम केलंय. देवा श्री गणेशा सारख्या मराठी मालिकेतही ती दिसली.

काय रे रास्कला आणि माझ्या बायकोचा प्रियकर या चित्रपटात तिने काम केलंय. तसेच तेलुगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातही ती झळकली आहे.

अधिक वाचा-

Back to top button