

शाहूपुरी पोलिस ठाण्याचा अंमलदार म्हणून कर्तव्यावर असताना 5 हजाराची लाच घेताना पोलिस कॉस्टेबल रंगेहाथ सापडला.
सागर इराप्पा कोळी (रा.उचगाव ता.करवीर) असे संशयितांचे नाव आहे.
तक्रारदारची वादातील इनोव्हा गाडी परत मिळवून देणेकरिता सोमवारी १० हजार रुपये घेतले होते. तर आणखी ५ हजार रुपये घेऊन तक्रारदाराला मंगळवारी रात्री बोलावले होते. मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ही लाचेची रक्कम घेताना त्याला पकडण्यात आले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मोरे, संजीव बम्बर्गेकर, अजय चव्हाण, कृष्णात पाटील, रुपेश माने यांच्या पथकाने कारवाई केली.
संशयित सागर कोळी यांच्याकडे रात्री ९ नंतर ठाणे अंमलदार पदाची जबाबदारी होती. तक्रारदाराला त्याने पोलिस ठाण्यात गर्दी कमी असताना म्हणजे रात्री १२ नंतर बोलावून ही लाच स्वीकारली.