देवमाणूस या मालिकेद्वारे घराघरात पोहचलेली नेहा सध्या लंडनमध्ये एन्जॉय करत आहे.

नेहाने आपल्या मदमस्त सौंदर्य आणि कातिल अदांनी अवघ्या मराठी सिनेसृष्टीला वेडं लावले आहे

नेहा खानने मराठीतील एक बोल्ड, हॉट आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 

अमरावतील येथील अगदी गरीब घरातून येऊन तिने स्वत:च्या प्रतिभा आणि सौदर्याच्या बळावर स्वत:ला सिद्ध केले आहे.

नेहाने शिकार, बॅड गर्ल, काळे धंदे (वेब सिरीज), हाफ टुथ, गुरुकूल या सारख्या चित्रपटात काम केले आहे.

यासह तिने मल्याळ आणि तेलगु सिनेमात काम केले आहे. तसेच शाहरुख खान, जिमी शेरगिलसह  मल्याळी अभिनेता मोहन लाल सोबत सुद्धा तिने काम केले आहे.

शिकारी या मराठी सिनेमात तिने अतिशय बोल्ड आणि धाडशी भूमिका केली होती. चित्रपट आपटला पण, तिच्या अभिनयाची फार चर्चा झाली होती.

देवमाणूस या मालिकेमुळे ती मराठी रसिकांच्या घराघरात पोहचली.

नेहा सध्या लंडनमध्ये असून ‘कधी प्रेम, कधी गोंधळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून ती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.