Rocky Aur Rani Kii Prem Kahaani: आलिया-रणवीरची जबरदस्त केमिस्ट्री (Teaser)

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani
Rocky Aur Rani Kii Prem Kahaani

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड चित्रपट निर्माता करण जोहरने प्रेक्षकांसाठी नवी लव्ह स्टोरी आणलीय. करण जोहरचा आगामी चित्रपट 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ची चर्चा सुरु आहे. (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) आलिया भट्ट, रणवीर सिंह स्टारर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. टीझरमध्ये रणवीर सिंह-आलिया भट्टची पुन्हा एकदा दमदार केमिस्ट्री प्रेक्षकांची मने जिंकायला तयार आहे. (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani)

करण जोहरने एक पोस्ट शेअर केली होती. करणने म्हटलं होतं की, २० जून रोजी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' ची पहिली झलक ११:४५ ला पाहायला मिळेल. धर्मा प्रोडक्शन्सने आपल्या यूट्यूब चॅनेलवर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'चे टीझर रिलीज केले आहे.

१ मिनिट १९ सेकंदाच्या टीझरमध्ये आलिया-रणवीरची दमदार केमिस्ट्री दिसत आहे. दोघांमध्ये प्रेम, रोमान्स, लग्न, भांडणे आणि मग एमेकांपासून विलग होणे दाखवलं आहे. व्हिडिओमध्ये जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आजमी यांचीही झलक पाहायला मिळते. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' २८ जुलैला चित्रपटगृहात पाहायला मिळेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news