Adipurush वर तत्काळ बंदी घाला; ऑल इंडिया सिने वर्कर्सचे पीएम मोदींना पत्र

adipurush
adipurush

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑल इंडिया असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आदिपुरुष चित्रपटाचे स्क्रिनिंग थांबवण्याची मागणी केली आहे. (Adipurush) तसेच तत्काळ थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी पत्रातून करण्यात आलीय. (Adipurush)

"आम्हाला दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मंतशिर शुक्ला आणि चित्रपटाच्या निर्मात्यांविरुद्ध एफआयआरची गरज आहे." असे पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, मनोज मुंतशिर याला कुणीतरी गप्प बसवा, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. मनोज मुंतशिर यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सोशल मीडियावर मोठा गोंधळ सुरु आहे. प्रेक्षकांनी मनोज मुंतशिरद्वारा बजरंग बलीसाठी लिहिलेल्या संवादावर आपत्ती दर्शवली आहे. आता मनोज मुंतशिर यांनी म्हटले आहे की, बजरंग बलीने भगवान नाही भक्त आहेत. आपण त्यांना भगवान मानतो.

ओम राऊत यांचा चित्रपट आदिपुरुष वादग्रस्त ठरला आहे. चित्रपटातील संवाद, भाषा आणि व्हीएफएक्समुळे टीका होत आहे. आता पुन्हा आदिपुरुषवर बंदी घालण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news