मिसेस मुख्यमंत्रीनंतर अमृता धोंगडे नव्या कार्यक्रमात झळकणार | पुढारी

मिसेस मुख्यमंत्रीनंतर अमृता धोंगडे नव्या कार्यक्रमात झळकणार

पुढारी ऑनलाईन :

आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजीकडून किंवा आईकडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात ‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रातून पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे. नुकतंच प्रेक्षकांनी नवरात्री विशेष भाग अनुभवले. आता मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता धोंगडे एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अमृता धोंगडे हिने उत्सुकता व्यक्त केली.

आता येत्या आठवड्यापासून शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या निमित्ताने मिसेस मुख्यमंत्री या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धोंगडे एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत ती सूर्यदेवांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारताना आणि पुन्हा एकदा टेलिव्हिजन या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी अमृताने उत्सुकता व्यक्त केली.

तेव्हा पाहायला विसरू नका घेतला वसा टाकू नको ‘शनीदेवांची जन्मकथा आणि शनी देव माहात्म्य’ विशेष सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

दरम्यान, अमृताचे साडीतील फोटोज व्हायरल झाले आहेत. #sareewalidiwali with karagiri..!! अशी कॅप्शन लिहित तिचा साडीतली ससोज्वळ लूक व्हायरल झालाय.

दुसऱ्या साडीतील फोटोंमध्ये तिचा मराठमोळा अंदाज दिसतो. नाकात नथ, हिरव्या रंगाच्या काठाची लाल रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या ब्लाऊजमध्ये दिसत आहे. या फोटोला तिने अग बाई ग…. 😍☺️😊 अशी कमेंट लिहिलीय.

काही महिवन्यांपूवीर्वी तिने लाल रंगाच्या साडीत तिने छत्री घेऊन फोटोशूट केलाय. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी तिला कडक!, लाल लाल रसाळ, मदमस्त, Looking so beautiful अशा कमेंट्स केल्या आहेत.

दुसऱ्या एका नेटकऱ्याने तिला- ‘युंही बिना बारिश में छाता लिए वह भीग रही थी, उसकी आँखें पानी की बुंदो सी चम़क रही थी’ अशी कमेंट दिलीय.

तिने आपल्या साडीतल्या फोटोंना मुस्कुराहट भी मुस्कराती है, जब वो आपके होठों से होकर आती है….अशी कॅप्शन लिहिलीय. आणखी एका फोटोला तिने कॅप्शन लिहिलीय की-एक लडकी भिगी भागिसी 🤫❤️❤️.

आणखी एका फोटोला तिने ‘मनाला हुरहुर लावून देणारा तो पाऊस..कुणाची तरी आठवण करून देणारा तो पाऊस..हळूच अलगद भिजवणारा तो पाऊस…!!’ अशी कॅप्शन लिहिलीय.

दुसऱ्या एका फोटोत ती खण साडीत दिसते. या फोटोला ती म्हणतेय-वाट पाहुनी जीव शिणला. दिसा मागुनी दिसं टळला
सुर्व्या आला, तळपून गेला. मावळतीच्या खळी गालाला. गडणी, सखे गडणी..

तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दिली असून भरभरून कमेंट्स येत आहेत. मिसेस मुख्यमंत्री या छोट्य़ा पडद्यावरील मालिकेत तिने सुमीची भूमिका साकारली होती. यामध्ये तिची तडफदार भूमिका पाहायला मिळाली होती.

अधिक वाचा- 

Back to top button