सातारा: जिल्हा बँकेसाठी मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर बिनविरोध | पुढारी

सातारा: जिल्हा बँकेसाठी मकरंद पाटील, राजेंद्र राजपुरे, शिवरूपराजे खर्डेकर बिनविरोध

सातारा : पुढारी वृत्तसेवा

सातारा जिल्हा बँकेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दोन जागा बिनविरोध झाल्या. यामध्ये खरेदी विक्री संघातून आ. मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र रजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदार संघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. त्यामुळे मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले आहेत. परंतु शेवटच्या दिवसापर्यंत खरेदी-विक्री मतदारसंघ, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे.

त्यामुळे खरेदी-विक्री मतदारसंघातून मकरंद पाटील, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटीतून राजेंद्र राजपुरे आणि कृषिप्रक्रिया मतदारसंघातून शिवरूप राजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. आता उर्वरित 18 संचालकांसाठी माघारी पर्यंत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.

Back to top button