NCB Questioning Ananya Pandey : अनन्‍या पांडेला समन्‍स, आज पुन्‍हा होणार चौकशी

NCB Questioning Ananya Pandey : अनन्‍या पांडेला समन्‍स, आज पुन्‍हा होणार चौकशी
Published on
Updated on

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री अनन्‍या पांडे हिच्‍या अडचणी वाढ हाेताना  दिसत आहे. नार्कोटिक्‍स कंट्रोल ब्‍युरोकडून (एनसीबी) तिला पुन्‍हा एकदा समन्‍स बजावण्‍यात आला आहे. याप्रकरणी आज तिची चौकशी होणार असल्‍याचे (NCB Questioning Ananya Pandey ) सूत्रांनी सांगितले.

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी आर्यन खानच्‍या व्‍हॉटस ॲप चॅटमध्‍ये अनन्‍या पांडे हिचे नाव समोर आले होते. यानंतर तिची घरी एनसीबीने छापा टाकला. (NCB Questioning Ananya Pandey ) यानंतर २१ ऑक्‍टोबर रोजी अनन्‍या पांडे हिचा दोन तास चौकशी झाली. यानंतर २२ रोजीही एनसीबीने तिची सुमारे चार तास चौकशी केली होती.

(NCB Questioning Ananya Pandey ) अनन्‍या पांडेचा फोन, लॅपटॉप जप्‍त

याप्रकरणी मीडिया रिपोर्टसनुसार, अनन्‍या हिने ड्रग्‍जचे सेवन केलेले नाही. तसेच चौकशी दरम्‍यान ती खूपच घाबरुन गेली होती. एनसीबीच्‍या अधिकार्‍यांनी तिचा लॅपटॉप आणि फोन जप्‍त केला आहे. आर्यन खानबरोबरील व्‍हॉटस ॲप चॅटिंगमध्‍ये ड्रग्‍जचा उल्‍लेख आढळला. यासंदर्भात एनसीबीने तिची चौकशी केली असता मी मस्‍करी करत होते, असा खुलासा तिने केला आहे.
ड्रग्‍ज प्रकरणात चौकशी झाल्‍यानंतर अनन्‍या पांडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर ट्रोल होत आहे.

हेही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news