Advertisement : शाहरुख खान आता छोट्या दुकानदारांचाही करणार जाहिरात | पुढारी

Advertisement : शाहरुख खान आता छोट्या दुकानदारांचाही करणार जाहिरात

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी सण म्हटलं की, घरातील टीव्हीवर, हातातील स्मार्टफोनवर, रस्त्यांवरील झगमगणाऱ्या फ्लेक्सवर, धावणारा बसेसवर जाहिरातीच जाहिराती (Advertisement) दिसतात. या जाहिराती इतक्या आकर्षक केलेल्या असतात की, पाहताच क्षणी त्यातील ब्रॅण्डबद्दल आणि वस्तुबद्दल खरेदीदाराची उत्सुकता वाढीस लागते. यात बऱ्याचदा लोकांच्या सहानुभूतीचा फायदा घेतला जातो. लोकांना इमोशनल केलं जातं. अशाच अनेक जाहिरातींपैकी एक जाहिरात आहे ती म्हणजे कॅडबरीची!

आता कॅडबरीची जाहिरात इतर जाहिरांतीच्या तुलनेत लोकांचं लक्ष खेचण्यात अग्रेसर असते. यंदाच्या कॅडबरीच्या जाहिरातीत (Advertisement) सध्या चर्चेत असणारा अभिनेता शाहरुख खान दिसत आहे. त्यात तो एका खास मुद्द्यावर बोलला आहे.

तो या जाहिरातीत कोरोना काळात तोटा झालेल्या छोट्या उद्योगांचे आणि दुकानदारांचे प्रमोशन करताना दिसत आहे. आम्ही शाहरुख खानला अनेक लहान व्यवसायांचं ब्रॅण्ड एम्बेसेडर बनवून मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, असं कंपनीने या व्हिडीओसंदर्भात म्हंटलं आहे.

जाहिरातीमध्ये शाहरुखने शेरवानी परिधान केला आहे. यात तो दिवाळीसाठी त्याने आजुबाजूच्या दुकानांमधूनच सर्व शॉपिंग केल्याचे सांगत प्रेक्षकांनादेखील आजुबाजुच्या दुकानांमधूनच वस्तू आणि दिवाळीची खरेदी करताना दिसत आहे.

असं आहे जाहिरातीचं वैशिष्ट्य

मशीन लर्निंगचा वापर करून या जाहिरातीमधील शाहरुख खानचा महत्वाचा भाग शूट करण्यात आला आहे. म्हणजे शाहरुख खान सांगत असलेल्या दुकांनांची नावे ही शाहरुखचा चेहरा आणि त्याचा व्हॉईस ओव्हर जुळवण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करण्यात आला आहे.

सर्वच दुकानांच्या नावाचा समावेश करणं शक्य नसल्याने हे तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. एवढचं नव्हे तर आता मशीन लर्निंगच्या मदतीने अनेक दुकानदारांना शाहरुख खानला घेऊन त्यांच्या दुकानाची जाहिरात करता येणार आहे.

विशेष हे की, कंपनीने छोट्या दुकानदारांचा विचार करून एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे ‘नॉट जस्ट ए कॅडबरी एड’ असं म्हणत कंपनीने कोणत्याही व्यावसायिकाला किंवा दुकानदाराला शाहरुखच्या या व्हिडीओचा वापर करुन जाहिरात बनवण्याचे अधिकार दिले आहेत.

पहा व्हिडीओ : प्रार्थना बेहरेची अभिनयाबरोबरत अनोखी कलाकारी

Back to top button