अभिनेत्री वर्षा दांदळे यांची अपघातानंतर मुख्यमंत्र्यांसाठी खास पोस्ट - पुढारी

अभिनेत्री वर्षा दांदळे यांची अपघातानंतर मुख्यमंत्र्यांसाठी खास पोस्ट

पुढारी ऑनलाईन :

पाहिले न मी तुला या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत उषा मावशीची भूमिका वर्षा दांदळे यांनी साकारली होती. वर्षा दांदळे यांचा काही दिवसांपूर्वी रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या असून बेडवर झोपून आहेत. त्यांनी या अपघाताची माहिती इन्स्टाग्रामवर पोस्ट करून दिली होती. या पोस्टची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली. त्यानंतर वर्षा यांनी मुख्यमंत्र्यांसाठी खास पोस्ट लिहिलीय.

वर्षा यांनी आपल्या आजारपणाची माहिती पोस्ट लिहून चाहत्यांना दिली होती. याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशांनुसार दांदळे यांची भेट घेतली. पेडणेकर या नाशिकला गेल्या. तेथे दांदळेची विचारपूस केली. त्याचबरोबर, सर्वतोपरी मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे.
या भेटीचे फोटो वर्षा दांदळे यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात.

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय-

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री श्रीमती वर्षा दांदळे यांच्या अपघाताची बातमी महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना समजताच त्यांनी श्रीमती वर्षा दांदळे यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना नाशिक येथे जाऊन त्यांची भेट घेण्याचे निर्देश दिले. त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिक्षिका व अभिनेत्री वर्षा दांदळे यांची नाशिक येथील त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली. त्‍यांच्‍या  तब्येतीची आस्थेने विचारपूस केली. पुन्हा आपण चित्रपट क्षेत्रात नव्या उत्साहाने, उमेदीने काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन करावे, अशा शुभेच्छा दिल्या. यासोबतच आजारातून लवकर बरे होण्यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली.

याप्रसंगी नगरसेविका सिंधू मसुरकर उपस्थित होत्या. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद महापौर मॅडम 🙏🙏 कलाकाराला तुमच्या राज्यात मान आहे प्रेम आहे शतशः प्रणाम. दांदळे या बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षिका व अभिनेत्री आहेत.

कोण आहेत वर्षा?

वर्षा यांनी अनेक मालिकांमध्ये काम केलंय.  पाहिले न म तुला या मालिकेतील त्यांची उषा मावशीची भूमिका प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. त्या मुंबई महापालिकेमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.

पाहिले न मी तुला या मालिकेत वर्षा दांदळे यांनी उषा मावशीची भूमिका साकारली होती.

असा झाला अपघात

भंडारदरा येथून मुंबईला परत येत असताना अभिनेत्री वर्षा दांदळे यांच्या गाडीला अपघात झाला. आपल्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांनी पोस्ट करून दिली होती. तसेच आपल्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते. त्यांची प्रकृती ठीक व्हावी म्हणून असंख्य चाहत्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करते.

हेही वाचलं का?

 

Back to top button