HBD Mallika : मल्लिका शेरावतला नको होत्या बोल्ड भूमिका पण… | पुढारी

HBD Mallika : मल्लिका शेरावतला नको होत्या बोल्ड भूमिका पण...

पुढारी ऑनलाईन :

एका छोट्याशा गावातून आलेली मल्लिका शेरावत (Mallika) स्टार कशी बनली? रेकॉर्डतोड चुंबनदृश्ये देऊन प्रेक्षकांना तिने कसे खिळवून ठेवले. या विषयीची उत्तरे तुम्हाला ही पुढील माहिती वाचून मिळतील. ऑनस्क्रिन चुंबनदृश्ये द्यायलाही तिने मागे-पुढे पाहिले नाही. बोल्ड आणि मादक अदांवर अनेक चाहते फिदा होणाऱ्या या ‘बॉलिवूड-ए-मल्लिका’ विषयी (Mallika) ही इंटरेस्टिंग माहिती जाणून घ्यायला हवीचं.

आज २४ ऑक्टोबर रोजी तिचा वाढदिवस आहे. तुम्हाला माहितीये का? मल्लिका (Mallika)  हिला अभिनय क्षेत्रात जाण्यास विरोध होत होता. पण, तिला अभिनेत्री व्हाय़चं होतं. असंख्य स्वप्ने घेऊन मुंबईला आलेल्या मल्लिकाला मात्र बोल्ड भूमिका नको होत्या. पण, नशीब कुठे नेईल, कुणालाचं ठाऊक नसते. तिला संधी मिळाली आणि ‘बोल्ड मल्लिका’ अशी तिची प्रतिमा निर्माण झाली.

१)  मल्लिका शेरावतचे खरे नाव रीमा लांबा आहे. तिचा जन्म हरियाणातील हिसार जिल्ह्यातील एका छोट्या गावात २४ ऑक्टोबर, १९७६ रोजी झाला होता.

२) ती जाट परिवारातील आहे. चित्रपटात येण्यास तिच्या कुटुंबीयांचा विरोध होता.

३) मल्लिका शेरावतचे वडील मुकेश कुमार लांबा आहे. लांबा आडनाव असताना मल्लिकाने शेरावत हे नाव कसे स्वीकारले, यामागे कारण आहे. शेरावत हे तिच्या आईच्या माहेरकडील आडनाव आहे. हेच आडनाव मल्लिकाने आपल्या नावापुढे लावले.

४) मल्लिका शेरावतने दिल्ली युनिव्हर्सिटीच्या मिरांडा हाऊस कॉलेजमधून फिलॉसॉफीमध्ये पदवी घेतली आहे.

५) चित्रपटांत येण्यापूर्वी मल्लिकाला अमिताभ बच्चन यांच्यासोबत बीपीएल आणि शाहरूख खानसोबत जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली होती.

६) तिने चित्रपटाच्या आधी निर्मल पांडेचा म्युझिक व्हिडिओ ‘मार डाला’ आणि सुरजीत बिंद्राकियाचा व्हिडिओ ‘लक तुनो’ मध्ये काम केलं आहे.

७) करीना कपूर-तुषार कपूर स्टारर ‘जीना सिर्फ मेरे लिए’ चित्रपटात तिची पहिली भूमिका होती. यामध्ये तिचे नाव रीमा लांबा लिहिले होते.

८) ख्वाहिश चित्रपटातून मल्लिकाला प्रसिध्दी मिळाली. कारण, या चित्रपटात तिने रेकॉर्डतोड चुंबनदृश्ये दिली होती.

९) अधिक लोकप्रियता मिळाली ती ‘मर्डर’ चित्रपटातून. हॉलिवूड चित्रपट ‘अनफैथफुल’ने प्रेरित होऊन हा चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटामध्ये तिच्यावर प्रणयदृश्ये साकारण्यात आली होती.

१०) मर्डरसाठी मल्लिकाला बेस्ट सिने ॲवॉर्डसाठी नामांकित करण्यात आलं होतं.

११) मल्लिकाने इंटरनॅशनल स्टार जॅकी चेनसोबत चित्रपट मिथमध्ये काम केलं होतं. यामध्ये तिची भूमिका एका भारतीय मुलगीची होती.

१२) मल्लिका शाकाहारी आहे. ती डेअरी उत्पादनेही वापरत नाही.

१३) मिथच्या प्रमोशनसाठी मल्लिका कान चित्रपट महोत्सवात गेली होती. येथे टाईम मासिकाच्या रिचर्ड कोर्लिसने तिला  उदयोन्मुख अभिनेत्री म्हटले होते.

१४) २०१२ मध्ये मल्लिका शेरावत, अमेरिकेचा पॉप स्टार ब्रुनो मार्ससोबत पॅरोडी व्हिडिओ साल्ट एन पॅपा वाटा मॅन फॉर द कॉमेडीमध्ये दिसली होती.

१५) चित्रपटात सयेण्यापूर्वी मल्लिका एअर होस्टेस होती. त्यानंतर ती मॉडलिंगकडे वळली.

१६) २००० मध्ये मल्लिका शेरावतने जेट एअरवेजचा पायलट करण सिंह गिलशी लग्न केलं होते. नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता.

१७) मल्लिका शेरावत अशी पहिली भारतीय अभिनेत्री होती, जिला प्रसिद्ध प्लेबॉय मासिकाच्या कव्हर पेजवर न्यूड पोझ फोटोशूट करण्याची ऑफर मिळाली होती. पण, ही ऑफर तिने नाकारली. कारण तिला भीती होती की, बॉलिवूडमध्ये तिला ब्लॅकलिस्ट केलं जाईल.

१८) मल्लिका शेरावतला कार्यक्रम बॅचलोरेट इंडियाच्या प्रत्येक एपिसोडसाठी एक कोटी रुपये दिले गेले होते.

१९) प्रसिद्ध संगीतकार यन्नीने लॉस एंजिलसमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात एक गाणे मल्लिकाला डेडीकेट केलं होतं.

२०) मर्डर आणि ख्वाहिश चित्रपटानंतर मल्लिका शेरावतने आपले मानधन वाढवले. असे म्हटले जाते की, हिमेश रेशमियाचा चित्रपट ‘आप का सुरूर’मध्ये १० मिनिटांच्या भूमिकेसाठी मल्लिकाने १.५ कोटी रूपये घेतले होते.

(photo: mallikasherawat48 instagram वरून साभार)

Back to top button