कोल्हापूर : चिमुकल्यांची आनंदमय व निसर्गरम्य दाजीपूर सफर

कोल्हापूर : चिमुकल्यांची आनंदमय व निसर्गरम्य दाजीपूर सफर
Published on
Updated on

राधानगरी; पुढारी वृत्तसेवा: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून राधानगरी व निसर्गरम्य दाजीपूर अभयारण्य साकारले आहे. जैवविविधतेने नटलेला हा निसर्गसंपन्न परिसर जगभरातील पर्यटकांना नेहमीच साद घालतो. लहान मुलांसाठी ही प्रेक्षणीय स्थळे नेहमीच औसुक्याचा विषय असतात.

कोल्हापुरातील एचआयव्हीसह जगणाऱ्या अनाथ चिमुकल्यांना हा परिसर प्रत्यक्षात दाखवण्यासाठी दैनिक 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशन व वन्यजीव विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राधानगरी-दाजीपूर विशेष सफरीचे आयोजन (दि. २१) करण्यात आले होते. यावेळी एनकेपीप्लस (विहान) संस्थेचे सदस्य असणाऱ्या चिमुकल्यांनी या निसर्गरम्य सफारीचा आनंद लुटला.

या सफारीमध्ये राधानगरी फुलपाखरू उद्यान, ऐतिहासिक हत्तीमहाल परिसर, उगवाईदेवी मंदिर, कोकण दर्शन पॉईंट, दाजीपूर येथील निसर्ग माहिती केंद्र, माळेवाडी डॅम बोटिंग स्थळ, राऊतवाडी धबधबा, राधानगरी धरणाचे सात दरवाजे यासह परिसरातील विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यात आली.

स्थळांच्या भेटीदरम्यान निसर्गवैभव, ऐतिहासिक महत्व, वन्यजीव अधिवास, जैवविविधता यांची सविस्तर माहिती मुलांना दिली. स्थळांचे जतन- संवर्धन-संरक्षण करण्याचा संकल्प उपक्रमात करण्यात आला. यावेळी विहानचे आशिष खरबडे, संदीप पाटील, रोहित गायकवाड, भरतेश फिरगाने, योगेश सोनपराते उपस्थित होते.

उपक्रमास विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) विशाल माळी, कसबा तारळे येथील काका आठवले विद्यार्थी वसतिगृह यांचे विशेष सहकार्य मिळाले.

माहितीपूर्ण चित्रफिती

'हेरिटेज कोल्हापूर' उपक्रमांतर्गत दै. 'पुढारी' प्रयोग सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून हत्तीमहाल, दाजीपूर अभयारण्य यासह विविध स्थळाच्या माहितीपूर्ण चित्रफितीचा संग्रह करण्यात आला आहे. या चित्रफिती मुलांना सफारीदरम्यान आवर्जून दाखवण्यात आल्या. मुलांकडून या चित्रफिती शाळेमध्ये दाखवण्याच्या आलेल्या आग्रहानुसार पुढील उपक्रमांचे नियोजन करण्यात येणार आहे.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : अद्भूत पश्चिम घाट 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news