Alia Bhatt Grandfather Death: आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांचे निधन | पुढारी

Alia Bhatt Grandfather Death: आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले. अनेक दिवसांपासून ते फुफ्फुसाशी संबंधित आजारी होते. आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी त्यांच्या मृत्यूची माहिती दिलीय. बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र राजदान यांना फुफ्फुसात संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, सोनी राजदान व आलिया भट्ट यांना एका ॲवॉर्ड शोसाठी परदेशात जायचं होतं. पण, आजोबांना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांनी शेड्यूल कॅन्सल केलं.

दिग्गज अभिनेत्री सोनी राजदान यांनी इन्स्टाग्रामवर वडिलांच्या मृत्यूची माहिती देत एक नोट शेअर केलीय. त्यांनी आपल्या वडिलांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलाय आणि लिहिलंय-‘डॅडी’. सोबत एक ब्रोकन हार्ट इमोटिकॉन देखील शेअर केला आहे.

आलिया भट्टची पोस्ट

आलिया भट्टने एक भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांच्या ९२ व्या वाढदिवसानिमित्त केक कापताना दिसत आहे. शिवाय त्यांच्यासोबत रणबीर कपूरदेखील दिसतो.

आलियाने लिहिलं, ‘माझे आजोबा. माझे हिरो, ९३ पर्यंत गोल्फ खेळले. ९३ पर्यंत काम केलं. सर्वात टेस्टी ऑमलेट बनवलं. खूप छान कहाण्या ऐकवल्या. वायोलिन वाजवलं. नातवंडांसोबत खेळवे. त्यांना क्रिकेट आवडायचे. स्केचिंग आवडायचे. परिवार आणि अंखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी जीवनाशी प्रेम केलं. माझं मन दु:खाने भरले आहे…’

 

View this post on Instagram

 

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

Back to top button