द केरला स्टोरीमुळे उत्कृष्ट चित्रपटांना फटका : नसिरुद्दीन शहा | पुढारी

द केरला स्टोरीमुळे उत्कृष्ट चित्रपटांना फटका : नसिरुद्दीन शहा

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शहा नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता त्यांनी एका मुलाखतीत ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबद्दलही उघडपणे भाष्य केले आहे. हा चित्रपट पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, या चित्रपटामुळे ‘भीड’, ‘अफवाह’, ‘फराज’ यासारख्या उत्कृष्ट चित्रपटांना बराच फटका बसला आहे. हे तीन चित्रपट पाहण्यासाठी लोक आले नाहीत, पण ‘द केरला स्टोरी’साठी लोकांनी बॉक्स ऑफिसवर गर्दी केली. मी ‘द केरला स्टोरी’ बघितलेला नाही आणि भविष्यात तो बघेन, असेही मला वाटत नाही कारण त्याबद्दल मी बरेच ऐकले आणि वाचले आहे.

Back to top button