HBD Mani Ratnam : मणि रत्नम यांचा 67 वा वाढदिवस, कमल हसनसोबत मोठा प्रोजेक्ट | पुढारी

HBD Mani Ratnam : मणि रत्नम यांचा 67 वा वाढदिवस, कमल हसनसोबत मोठा प्रोजेक्ट

पुढारी ऑनलाईन डेस्क : मणि रत्नम हे अशा प्रथितयश दिग्दर्शकांपैकी एक आहेत ज्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी अशा अनेक भारतीय भाषांमध्ये चित्रपट बनवले आहेत. हा पद्मश्री पुरस्कार प्राप्त दिग्दर्शकांना रोजा, बाँबे, इरूवर, दिल से.. आणि कन्नाथील मुथामित्तल अशा अनेक चित्रपटांसाठी ओळखलं जातं. (HBD Mani Ratnam) त्यांच्या आधीच्या नायकन आणि अंजली, अशी शीर्षकांनाही भारताकडून अधिकृत प्रकारे ऑस्करसाठी पाठवली गेली होती. येणाऱ्या काळात मणि रत्नम एका चित्रपटासाठी कमल हसनसोबत काम करताना दिसणार आहेत. हा चित्रपट शक्यतो 2024 मध्ये प्रदर्शित होईल. (HBD Mani Ratnam)

IMDb वरील मणि रत्नमची सर्वाधिक रेटिंग असलेली टॉप 10 शीर्षके अशी‌ आहेत:

1. नायकन – 8.6

2. थालापती – 8.5

3. कन्नाथील मुथामित्तल – 8.4

4. इरूवर – 8.4

5. मौना रागम – 8.4

6. अलाईपेयुथे – 8.3

7. गीतांजली – 8.3

8. अंजली – 8.2

9. बाँबे – 8.1

10. रोजा – 8.1

Back to top button