Srishty Rode सृष्टी रोडेच्या बॅकलेस ग्लॅमरस फोटोंनी धुमाकूळ | पुढारी

Srishty Rode सृष्टी रोडेच्या बॅकलेस ग्लॅमरस फोटोंनी धुमाकूळ

पुढारी ऑनलाईन :

सृष्टी रोडे (Srishty Rode) ही बिग बॉस १२ ची (Bigg Boss 12) स्पर्धक आहे. बिग बॉस-१२ मधून तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती. याशिवाय ती किचन चॅम्पियन ५ मध्येही दिसली होती. सृष्टी रोडे इन्स्टाग्रामवर ॲक्टिव्ह राहते. ती आपले ग्लॅमरस आणि सुंदर फोटो शेअर करते. तिच्या फोटोंवर लाखो फॅन्स कमेंट करतात. आताही तिने इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घातलाय. Woke up like this ☕️ अशी कॅप्शन देत तिने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसतेय. तिचा ग्लॅमरस अंदाज प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे. मालदिवचं फिल गोव्यात असे म्हणत एका चाहतीने तिच्या फोटोंना कमेंट दिलीय. तिने एका इमारतीच्या गच्चीवर हे फोटोशूट केलं आहे. पांढऱ्या रंगाच्या मोठ्या कापडामध्ये तिने स्वत:ला गुंडाळून घेतलंय. या फोटोंमध्ये ती बॅकलेस इमेजमध्ये दिसतेय.

सृष्टीचा ग्लॅमरस अंदाज फॅन्सना खूप आवडतोय. ती वेगवेगळ्या स्टायलिश आऊटफिटमध्ये फोटो शेअर करत राहते. तिला बिग बॉस १२ मधून रातोरात लोकप्रियता मिळाली होती. तिचं नाव रोहित सुचांतीशी नाव जोडण्यात आलं होतं.

मीडिया रिपोर्टनुसार, तिचं रिलेशनशिप आधी मनीष नागपालसोबत होतं. असं म्हटलं जातं की, त्यांचा साखरपुडाही झाला होता. बिग बॉस-१२ नंतर दोघांचा ब्रेकअप झाला.

सृष्टीला पोटाची तक्रार झाल्यानंतर तिची सर्जरीही झाली होती. तिने ही माहिती तिने सोशल मीडियावर दिली होती. बिग बॉस १४ ची विजेता रुबीना दिलैकची ती बेस्ट फ्रेंडदेखील आहे.

तिला फिरायला खूप आवडतं. ती कधी माउंटेन तर कधी समुद्राच्या ठिकाणी व्हेकेशनसाठी निघून जाते. टीव्ही मालिकांमध्येही तिने काम केलंय. तिने २००७ मध्ये ‘कुछ इस तरह’ मध्ये कॅमियो केला होता. यातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

यानंतर तिने इश्क हाय, छोटी बहू, शोभा सोमनाथ की, चलती का नाम गाडी, सरस्वतीचंद्र आणि इश्कबाज यासारख्या टीव्ही मालिकांमध्य़े काम केलंय. २०१८ मध्ये तिने बिग बॉसच्या १२ व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

हेदेखील वाचले का? –

 

View this post on Instagram

 

A post shared by Srishty Rode 🌼 (@srishtyrode24)

 

View this post on Instagram

 

A post shared by Srishty Rode 🌼 (@srishtyrode24)

 

View this post on Instagram

 

A post shared by Srishty Rode 🌼 (@srishtyrode24)

Back to top button