priya bapat : प्रियाची जादूगिरी तुम्हाला जमतंय का? (video) | पुढारी

priya bapat : प्रियाची जादूगिरी तुम्हाला जमतंय का? (video)

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मराठी अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट ( priya bapat ) यांच्या लग्नाला नुकतेच १० वर्ष उलटली असून दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. सध्या प्रिया बापटचा एक जादूचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

उमेश आणि प्रिया या जोडीला चाहते ‘Made for each other’ आणि ‘Couple Goal’ या नावाने ओळखतात. ही जोडी खूपच फेमस आहे. सध्या प्रियाने ( priya bapat ) आपल्या इंन्स्टाग्रामवर एक जादूचा खेळ करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत प्रिया निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच क्यूट दिसत आहे.

यात प्रियाने आपल्या तोंडासमोर हात न लावता एक संत्रे धरले आहे. ते संत्रे अंतराळी असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओतील ही खास जादू आहे. परंतु, यातील खरे सत्य असे की, तिने एका चमच्याला संत्रे अडवून तोंडात धरले आहे. इतर जादूगरासारखे नजर चुकवत चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी तिने ही जादू दाखवली आहे.

या व्हिडिओत पहिल्यांदा प्रियाने तोंडातील चमचा दाखवला नसल्याने तिच्या तोंडासमोर अलगद संत्रे असल्याचे दिसत आहे. परंतु, यानंतर व्हिडिओच्या शेवटी तिने आपल्या तोंडातील चमचा दाखवत डान्स करक चाहत्यांचे मनोरंजन केलं आहे. व्हिडिओ शेअर करताना प्रियाने ‘It’s magic time, FUN time..’अशा कॅप्शनसोबत हास्याचा ईमोजी शेअर केला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांकडून कॉमेंन्टसचा पाउस पाडत आहे. या एका चाहत्याने ‘व्वा विलक्षण अद्वितीय जादू’ तर दुसऱ्या एका चाहत्यांने आणि ‘काय हवं’ असे म्हटले आहे. यासोबत काही चाहत्यांनी हास्याचा आणि प्रेमाचा ईमोजी शेअर केला आहे. हा व्हिडिओला आतापर्यत २४ हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

प्रियाच्या लग्नाला नुकतेच १० वर्ष पुर्ण

उमेश कामत आणि प्रिया बापट यांनी २०११मध्ये विवाह बंधनात अडकले. याआधी प्रियाने नुकतेच लग्नाला १० वर्ष पुर्ण झाल्याने लग्नातील उखाने घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मडियावर शेअर केला होता. ‘माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दिवस, आमच्या लग्नातील सर्वांत चांगला क्षण. उमेश कामत १० वर्षे पूर्ण झाली,’ असे कॅप्शनमध्ये तिने लिहिले होते. हा व्हिडिए सोशल मीडियावर खुपच व्हायरल झाला होता.

‘टाईम प्लीज’ या मराठी चित्रपटात उमेश आणि प्रिया एकत्रित भूमिका साकारली होती. प्रिया लवकरच बॉलिवूड अभिनेता फरदीन खान व रितेश देशमुखसोबत हिंदी चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘आणि काय हवं?’ च्या तिसऱ्या सीजनमध्ये दिसली आहे.

हेही लाचलतं का?

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

 

View this post on Instagram

 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

Back to top button