

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानचे नाव मागील काही दिवसांत क्रिकेटर शुभमन गिल सोबत जोडले गेले होते. दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात होते. त्यांच्या डेटिंगच्या चर्चा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा दोघांना एकत्र पाहण्यात आले होते. पण, दोघांनी यावर मौन बाळगला. आतापर्यंत दोघांच्या नात्याबद्दल कोणतीही अपडेट समोर आली नव्हती. आता दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याचे म्हटले जात आहे.
अनेक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सारा अली खान आणि शुभमनने सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. यााआधी शुभमन हा सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंदुलकरला डेट करत होता. पण, आधीच दोघे नात्यातून वेगळे झाले आहेत, अशी माहिती समोर आली. पण तथाकथित वृत्ताची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.