Tanu Weds Manu Returns : तनु वेड्स मनू रिटर्न्स रिलीजला ८ वर्षे पूर्ण, आर माधवन म्हणतो… | पुढारी

Tanu Weds Manu Returns : तनु वेड्स मनू रिटर्न्स रिलीजला ८ वर्षे पूर्ण, आर माधवन म्हणतो...

पुढारी ऑनलाईन डेस्क : “तनु वेड्स मनु रिटर्न्स” या आयकॉनिक बॉलीवूड चित्रपटाच्या रिलीजला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. (Tanu Weds Manu Returns) त्यातून निर्माण झालेली जादू जगभरातील प्रेक्षकांवर कायम आहे. आनंद एल. राय दिग्दर्शित आणि आर. माधवन आणि कंगना रानौत या जोडीने रोमँटिक कॉमेडी-ड्रामाने लाखो लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. (Tanu Weds Manu Returns)

समीक्षक आणि चित्रपट पाहणाऱ्या दोघांनाही भुरळ पाडणारा हा चित्रपट ठरला आहे. यामध्ये त्यांनी लक्षणीय यश प्राप्त केलं. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेलं यश विजय आणि त्याला मिळालेली प्रशंसा ही त्याच्या कायम लोकप्रियतेचा पुरावा आहे.
“तनु वेड्स मनु रिटर्न्स”मध्ये आम्ही तनुजा “तनु” त्रिवेदी आणि मनोज “मनू” शर्मा या दोन पात्रांच्या चित्तथरारक प्रवासाचे साक्षीदार आहोत. आर. माधवनची प्रामाणिक आणि प्रेमळ मनूची भूमिका प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजली. कंगना राणौतने तनु आणि दत्तोच्या दुहेरी भूमिकांमध्ये चमकदार कामगिरी केली.

चित्रपटाचे यश आणि त्याचा परिणाम यावर विचार करताना आर. माधवन म्हणाला, “‘तनु वेड्स मनू रिटर्न्स’ रिलीज होऊन आठ वर्षे झाली आहेत. या चित्रपटाला माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे, आणि आजही या चित्रपटाला मिळत असलेले प्रेम आणि पाठिंबा पाहून मी भारावून गेलो आहे. हा प्रवास इतका संस्मरणीय बनवल्याबद्दल मी चित्रपटामागील टीम आणि प्रेक्षकांचा आभारी आहे.”

आनंद एल राय सांगतात, “तनु वेड्स मनूचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला आणि तनु वेड्स मनूच्या रिटर्नला आठ वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा अनुभव खूप मजेदार होता. काम करण्यासाठी माझ्या आवडत्या प्रकल्पांपैकी हा एक आहे. तसेच मला माधवन आणि कंगनाच्या टॅलेंटचा उत्तम वापर करून घेण्यात आला. मला खूप आनंद आहे की आजच्या काळात हा चित्रपट अजून ही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.”

तनु वेड्स मनू रिटर्न्स
तनु वेड्स मनू रिटर्न्स

दीपक डोबरियाल, स्वरा भास्कर, मोहम्मद झीशान अय्युब आणि जिमी शेरगिल यांसारख्या अभिनेत्यांनी उत्तम कामगिरी केली.
“तनु वेड्स मनु रिटर्न्स” हा भारतीय चित्रपटसृष्टीतील क्लासिक सिनेमा म्हणून साजरा केला जातो. त्याचे संस्मरणीय संवाद, संगीत आणिअविस्मरणीय पात्रे यांनी जगभरातील चित्रपट रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारी आहेत. आनंद एल राय यांच्याकडे फिर आयी हसीन दिलरुबासोबतच झिम्मा २ प्रोजेक्ट आहे.

Back to top button