अभिनेत्री सोनम पिंक आऊटफिटमध्ये फेमिनाच्या रेड कार्पेटवर | पुढारी

अभिनेत्री सोनम पिंक आऊटफिटमध्ये फेमिनाच्या रेड कार्पेटवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री सोनम गुलाबी स्ट्रीप्ड को-ऑर्ड्समध्ये फेमिनाच्या रेड कार्पेटवर सुंदर दिसत होती. स्ट्राइकिंग विंटेज डिझायनर नेक पीस ही अभिनेत्री सोनमच्या पिंक स्ट्रीप्ड को-ऑर्ड आउटफिटची स्टार आहे. प्रतिष्ठित अभिनेत्री सोनम हिने पुन्हा धमाकेदारपणे एन्ट्री घेतली आहे आणि तिच्या नवीन अवतारात ती नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसली. रेड-कार्पेटवरील तिच्या अदा पापराझींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली.

अलीकडेच या स्टाईल आयकॉनने एक फोटोशूट केले होते. स्ट्रिप केलेल्या गुलाबी कॉर्ड्समध्ये ती कमाल दिसत होती. सोनमने तिचे केस आणि सिंपल मेकअप करूनही आकर्षक दिसत होती. तिने परिधान केलेल्या अॅक्सेसरीज सर्वात जास्त उठवदार दिसत होत्या. विश्वात्मा, त्रिदेव, अजूबा, इत्यादी चित्रपटांमधील तिच्या वैशिष्ट्यपूर्ण भूमिकांसाठी ओळखली जाणारी ही फॅशनिस्टाला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Back to top button