Ray Stevenson
Ray Stevenson

Ray Stevenson Death: ‘आरआरआर’ फेम रे स्टीवेन्सन यांचे निधन

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मार्वलच्या Thor मध्ये अभिनय केलेले आणि आरआरआर (Ray Stevenson Death) या चित्रपटात दिसलेले अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले. इटलीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्टनुसार, त्यांच्या प्रतिनिधीने या वृत्ताची पुष्टी केली. टीम आरआरआरने सोशल मीडियावर लिहिलं, 'आपल्या सर्वांसाठी धक्कादायक वृत्त आहे! रेस्ट इन पीस, रे स्टीवेन्सन. तुम्ही नेहमीच आमच्या मनात राहाल, सर स्कॉट.' (Ray Stevenson Death)

रे स्टीवेन्सन यांनी एसएस राजामौलीचा पीरियड ॲक्शन ड्रामा 'आरआरआर' मध्ये निगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्याशिवाय, रे यांनी मार्वलचा 'थॉर' फ्रेंचायजीमध्ये वोल्स्टॅग आणि 'वायकिंग्स'मध्ये ओथेरे यासारख्या भूमिकांसाठी ओळखलं जातं. त्यांनी एनिमेटेड स्टार वॉर्स सीरीज 'द क्लोन वॉर्स' आणि 'रिबेल्स'मध्ये गॉर सेक्सन यांच्यासाठी आवाज दिला आहे शिवाय ते डिज्नी प्लसचा आगामी 'द मंडलोरियन' स्पिन ऑफ 'अशोका' मध्ये रोसारियो डावसन सोबत काम करणार होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news