Fast X : विन डीजलचा चित्रपट येताच 'द केरल स्टोरी'चे सिंहासन हलले | पुढारी

Fast X : विन डीजलचा चित्रपट येताच 'द केरल स्टोरी'चे सिंहासन हलले

पुढारी ऑनलाईन डेस्क : विन डीजलचा चित्रपट फास्ट ॲण्ड फ्युरियसनंतर १० व्या पार्टने धुमाकूळ घातलाय. फास्ट एक्स रिलीज होताच बॉक्स ऑफिस कलेक्शनची चलती सुरू झालीय. (Fast X) पहिल्या आठवड्यात हॉलीवूड चित्रपटाने द केरल स्टोरीचे सिंहासन हलवले आहे. एकीकडे ऐश्वर्या रायची पोन्नियन सेल्वन-२ बॉक्स ऑफिस आला. त्यानंतर ‘द केरल स्टोरी’ येताच पोन्नियन मागे पडला. (Fast X)

विन डीजल जस्टिन लिन, जो रोथ स्टारर ‘फास्ट एंड फ्युरियस-१०0’ ची क्रेझ खूप आहे. ॲक्शनने भरपूर फास्ट एक्सने बॉक्स ऑफिसवर ५९.७५ कोटी रुपयांचा नेट आणि ७१ कोटींचे एकूण कलेक्शन केलं आहे. हिंदी भाषेत या आठवड्याच्या शेवटी ‘फास्ट ॲण्ड फ्युरियस-१०’ ने२७.९ कोटी, तमिळमध्ये २ कोटी, तेलुगुमध्ये १.५५ कोटी आणि इंग्लिशमध्ये एकूण २८.३ कोटींचा बिझनेस केला.

जगभरातील कलेक्शन

इंडियन बॉक्स ऑफिसवर शनिवारी हिंदीमध्ये ७.१ कोटींचा बिझनेस केला. तर रविवारची कमाई ८.८५ कोटी झाली. वर्ल्डवाईड या चित्रपटाने आतापर्यंत २६०० कोटी रुपयांचा बिझनेस केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vin Diesel (@vindiesel)

Back to top button