बंगाली अभिनेत्री सुचंद्रा यांना ट्रकने चिरडले | पुढारी

बंगाली अभिनेत्री सुचंद्रा यांना ट्रकने चिरडले

कोलकाता : बंगाली मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री सुचंद्रा दासगुप्ता यांचा एका अपघातात जागीच मृत्यू झाला.
सुचंद्रा दासगुप्ता शनिवारी रात्री शूटिंग संपवून आपल्या घरी परतत होत्या. यासाठी त्यांनी अ‍ॅपवरून एक दुचाकी बुक केली होती. रस्ता ओलांडणारा एक सायकलस्वार अचानक त्यांच्या दुचाकीसमोर आला. त्याला वाचवण्यासाठी ब्रेक दाबताच मागून येणार्‍या ट्रकने त्यांना धडक मारली. सुचंद्रा कोसळल्या व ट्रक त्यांच्या अंगावरून गेला.

Back to top button